हृदयद्रावक! मी, त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो...

मी त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. मात्र, तिचे अन्य कुणाबरोबर तरी अफेअर सुरू होते. तरीही तिने मला खोटी स्वप्ने दाखवली.

सोलन (हिमाचल प्रदेश): एका युवकाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये या युवकाने जीवन संपवण्यामागचं कारण सांगितले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 

राज कुंद्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा...

मुकुल वारिया (वय 29) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी (ता. 20) त्याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास घेतला. त्याला त्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयाता दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. मुकुल हा लग्न आणि इव्हेंट्सच्या डेकोरेशनचे प्रोजेक्ट घेत असे. 

धक्कादायक! प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही...

मुकुलने आत्महत्येपूर्वी एक दीर्घ फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर छळाचा आरोप केला आहे. तसेच अखेरच्या वेळी एक ऑर्डर रद्द करावी लागली. त्यामुळे त्याच्याकडे ३५ हजार रुपये परत मागितले जात आहेत. यासर्वामुळे मी एकटा पडलो आहे. मला माफ करा मी आता खूप थकलोय. माझे कुटुंबीय माझ्यामुळे कधी समाधानी राहू शकले नाहीत. आता मी अडचणीत सापडलो आहे. आता मला या अडचणींना तोंड देणे जमत नाही आहे.

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

या फेसबुक पोस्टमध्ये मुकुलने कुटुंबीयांसोबतच एका मैत्रिणीचीही माफी मागितली आहे. त्यात तो म्हणतो की, 'तिनेसुद्धा मला खूप समजावले. पण मी समजू शकलो. नाही. तर त्याने अजून एका मुलीवर त्याला फसवल्याचा आरोप केला आहे. मी त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. मात्र, तिचे अन्य कुणाबरोबर तरी अफेअर सुरू होते. तरीही तिने मला खोटी स्वप्ने दाखवली. अखेरीस त्याने सर्वांची माफी मागितली आणि लिहिले की, "Don't cry because it's over smile because it happened."

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: youth commits suicide by posting suicide note on Facebook
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे