यवतमाळ जिल्हा पोलिस दलास गस्ती वाहनांचे हस्तांतरण

पोलिस विभागासाठी नव्याने ५४ जीप आणि ९५ दुचाकी प्राप्त

यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता ५४ जीप व ९५ दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या आहेत.

यवतमाळ : आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल ११२’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता ५४ जीप व ९५ दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या आहेत. पोलिस विभागाला त्याचे हस्तांतरण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिसकाकांच्या प्रसंगावधानामुळे वाचला मुक्या प्राण्याचा जीव!

पोलिस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. भुमरे यांनी नवीन जीपचे विधीवत पूजन व हिरवी झेंडी दाखवून सदर जीप पोलिस विभागाकडे हस्तांतरीत केल्या.

Video: कानून के हात लंबे होते है...

प्रास्ताविकात जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणाले, 'यापूर्वी पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ठ क्रमांक आहे. त्याच धर्तीवर आता आपात्कालीन मदतीसाठी 'डायल ११२' हा क्रमांक उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने मदतीसाठी कॉल केला तर कोणत्या जिल्ह्यातून फोन आला, याची माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानुसार सदर संदेश संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर फोन करणा-या नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध करून येईल.

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन; अशी आहे नियमावली...

जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ५४ जीप व ९५ दुचाकी साठी ६ कोटी ४४ लक्ष रुपये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. सदर वाहने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, सर्व पोलिस ठाणे आदी ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बापरे! 'माऊली' असे लिहिलेली मोटार तपासल्यावर बसला धक्का

कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार प्रदीप परदेशी, सायबर सेलचे सपोनि अमोल पुरी, अवधुतवाडी ठाण्याचे ठाणेदार श्री. केदारे, राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे आदी उपस्थित होते.

धक्कादायक: नवदांपत्याने तासाभराच्या अंतरात संपविले जीवन...

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

पुणे शहरात घरपोच देवगड आंबा हवा असल्यास 9511 827050 व्हॉट्सऍपवर क्रमांकावर संपर्क करा.

Title: yavatmal police news new 54 jeep and 95 bike for police depa
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे