पंचतारांकीत फार्महाऊसवर छापा; लाखो रुपये जप्त; पाहा नावे...
एसपी डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी पंचतारांकीत फार्महाऊसवर टाकला छापा
नियोजनाप्रमाने सदर फार्म हाऊस वर छापा टाकला असता तेथे २ खोल्यांमध्ये अवैधरित्या जुगार खेळतांना जवळपास १८ जण व मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली.यवतमाळ: पांढरकवडा रोड असलेल्या पंचतारांकीत स्वरा फार्महाऊस वर पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी छापा टाकला. यावेळी अवैधरित्या जुगार खेळणाऱया १८ जुगारीसह ८१ लाखाचा मुद्देमाल केला जप्त आहे.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यावर दृष्य पाहून बसला धक्का...
सवीस्तर वृत्त असे की, १२/०६/२०२१ रोजी पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना गोपनीय माहिती मिळाली की यवतमाळ शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या भारी गावांत स्थित पंचतारांकीत स्वरा फार्म हाऊस मधे नियमीत स्वरुपात जुगार भरविला जातो व येथे विदर्भातील नामांकीत लोक जुगार खेळण्याकरीता येतात. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नियोजन करुन पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या आदेशानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी यवतमाळ माधुरी बावीस्कर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. या सर्व मोहीमेचे नेतृत्व स्वतः पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ करीत होते.
बारामती येथे वेशांतर करून जुगार अड्ड्यावर छापा; पाहा नावे...
नियोजनाप्रमाने सदर फार्म हाऊस वर छापा टाकला असता तेथे २ खोल्यांमध्ये अवैधरित्या जुगार खेळतांना जवळपास १८ जण व मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. फार्महाउसमधील ही कारवाई जिल्हा पोलिस दलाचे इतिहासातील सर्वांत मोठी व प्रशंसनीय अशी कामगिरी मानली जात आहे. राजकीय पाठबळ असल्याने आतापर्यंत कुणीही छापा टाकण्याचे धाडस केले नाही. मात्र, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी विशेष पथकाच्या सहाय्याने सदर ठिकाणी कारवाई केली सदर कारवाहीत अनुक्रमे आरोपी-
१) गब्बर मोतेखॅा पठान वय ४२ रामनगर
२) आशिष शत्रुघ्न मडावी वय ३३ रा बेवडा चंद्रपुर
३) विनोद कवडु जिवतोडे वय ४० रा चिखलगाव ,वणी
४)मोहम्मद अफजल ईस्राईल अहमद सिद्दिकी वय २८ रा ईंदीरा नगर चंद्रपुर
५) हफीज खालील रहमान वय ५२ रा गुरुनगर,वणी
६) मोवीन मुस्लीम शेख वय ३० रा राजुर कॅालनी
७) सरफोद्दीन नत्रो शाह वय ५२ रा राजुरा
८) शंकर नानाजी खैरे वय २९ रा महाकाली नगर घुग्गुस
९) निलेश बाबाराव झोडे वय ३४ रा रामनगर घुग्गुस
१०) सुखदेव दत्ताजी धांदे वय ३७ रा गिरीजानगर,यवतमाळ
११) शंकर हनुमंत आत्राम वय ३४ रा चुनाभट्टी रोड,राजुरा
१२) अमीत यशवंत पाटील वय ३२ रा रामपुर राजुरा
१३) नंदकुमार रामप्रकाश खारीने वय २९ रा कलगाव ,मारेगाव,वणी
१४) दिपक शंकरराव धात्रक रा बस स्टॅडजवळ यवतमाळ
१५) राहुल संजय चित्तरवार वय २० रा शिवनगर,घुग्गुस
१६) नितीन अरविंद कुडमेथे वय २० रा शिवनगर,घुग्गुस
१७) आकाश प्रुथ्वीराज तिवारी वय ३१ रा बजेरिया नगर यवतमाळ
१८) रामेश्वर दत्ताजी व्यवहारे वय ४१ रा रामक्रिष्णनगर,यवतमाळ
यांच्या विरोधात पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींचे ताब्यातून १९ लाख ३० हजार रुपये रोख, १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल, ६०लाख ७० हजार किमतीची ५ चारचाकी व २ दुचाकी वाहने असा एकूण ८१ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोटार लॉक झाल्यामुळे चार शिक्षकांचा गुदमरुन मृत्यू...
या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पथकास पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी २५ हजार रु चे पारितोषिक जाहीर केले. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांचे आदेशानुसार व नियोजनानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी यवतमाळ माधुरी बावीस्कर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, गजानन करेवाड, गजानन डोंगरे, विशाल भगत, सुमीत पाळेकर, निलेश राठोड, उल्हास कुरकटे, मोहम्मद भगतवाले यांनी केली.
धक्कादायक! वडिलांच्या खूनाचा बदला घेतला खुनानेच; कसा तो पाहा...
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
Ram Uttarwar
Posted on 16 June, 2021खूप छा न बातमी