राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्यासाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....
महाविकास आघाडी सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे.मुबई : महाविकास आघाडी सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा प्रधान केली आहे. राज ठाकरे यांना याआधी Y प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण मध्यंतरी राज्य सरकारने Y प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. अखेर राज्य सरकारने पुन्हा राज ठाकरे यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. राज्य सरकारडून देण्यात आलेल्या या सुरक्षेवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त करत राज्य सरकार थट्टा करत आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांची मागणी न्यायालयाने फेटाळली; त्यामुळे...
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेनंतर धमकीचे फोन आणि पत्र येत होते. त्यामुळे मनसे नेत्यांकडून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु होती. अखेर मनसे नेत्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे याच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार मनसेची थट्टा करत आहे आहे का? सुरक्षेत वाढ करण्याच्या नावाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत एक पोलिस आणि एक निरीक्षक वाढवला असल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र; त्यामध्ये...
बाळा नांदगावकर म्हणाले, 'मी राज्याच्या गृहमंत्र्यांना काही दोष देणार नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारची एक समिती असते ही समिती कुणाला किती सुरक्षा पुरवायची याबाबतचा निर्णय घेते. या समितीत मुख्यमंत्री आणि आणखी एक-दोन जण असतात. राज ठाकरे यांची Z सेक्युरिटी होती. ती तुम्ही कमी करुन Y केली. मी गृहमंत्र्यांना भेटून पुन्हा Z दर्जाची सुरक्षा द्या म्हणून विनंती केली होती. पण आज मी जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा एक पोलिस निरीक्षक आणि एक पोलिस दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरुय. सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. तुम्ही सरकार म्हणून शपथ घेतात तेव्हा द्वेष करणार नाही, समानतेची वागणूक देऊ अशी शपथ घेतात. ज्यांना गरज नाही त्यांना प्रचंड सुरक्षा देवून ठेवली आहे. ज्यांना गरज आहे त्यांनाच का सुरक्षा दिली जात नाही? राज ठाकरे हा खुल्या दिलाचा माणूस आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. ते मनात काही ठेवत नाही.'
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट
राज ठाकरे यांना नोटीस; बाळासाहेबांच्या भाषणाचा Video शेअर...
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...