भूत बनून शेजाऱ्यांना घाबरवायला गेलेल्या महिलेसोबत काय घडले पहा ...

भूत असल्याचं नाटक करून दुसऱ्याला घाबरवण्याचा प्रयत्न करणारे आपण अनेकदा मालिका-सिनेमांमध्ये पाहतो. अशीच एक महिला पांढऱ्या साडीत भूत बनून शेजाऱ्यांना घाबरवात होती. पण यामध्ये घाबरून जाऊन एकाने तिच्यावर गोळीबार केला आणि या महिलेला आपला जीव गमवावा लागला.


मेक्सिको(उत्तर अमेरिका) : भूत असल्याचं नाटक करून दुसऱ्याला घाबरवण्याचा प्रयत्न करणारे आपण अनेकदा मालिका-सिनेमांमध्ये पाहतो. अशीच एक महिला पांढऱ्या साडीत भूत बनून शेजाऱ्यांना घाबरवात होती. पण यामध्ये घाबरून जाऊन एकाने तिच्यावर गोळीबार केला आणि या महिलेला आपला जीव गमवावा  लागला. 

ही घटना उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोदेशामधील नोकलपन डी जुआरेज येथील आहे. पोलिसांनी मृत तरुणीचे नाव जाहीर केलेले नाही. तरुणीचं वय 20 ते 25 वर्षाच्या दरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे. तिनं लॅटिन अमेरिकेच्या ला लोरोनाप्रमाणे स्वतःला तयार केलं होतं. ला एक कथित भुत होती, जी आपल्या मुलांच्या आठवणीत रस्त्यांवर रडत फिरत असे.

मेक्सिकोमधील ही मृत महिला याच प्रकारे रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरत होती. आसपास राहणाऱ्या लोकांनी तिचा व्हिडिओदेखील बनवला. एका स्थानिक रहिवाशानं याबाबत आणखी माहिती उघड करताना  सांगितलं, की ही तरुणी अतिशय भितीदायक गेटअपमध्ये होती. ती रडत रडत, माझी मुलं..माझी मुलं.. असं ओरडत होती. असेच एकदा तिला पाहून एक व्यक्ती प्रचंड घाबरला आणि गोळीबार करू लागला. यातच या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी तिथून फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

पोलिसांचं म्हणणं आहे, की 15 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेची चौकशी सुरू आहे. सध्या या प्रकरणाबाबत अधिक काही बोलता येणार नाही. मेक्सिकोमध्ये 31 ऑक्टोबरला हॅलोविन डे साजरा करण्याची तयारी सुरू आहे. यादिवशी लोक भूतांप्रमाणे मेकअप करतात. ते स्वतःला अशा प्रकारे तयार करतात की लोकांनी त्यांना पाहून घाबरावं, अशी प्रथा असल्याचे सांगण्यात येते. 

Title: women dressing as a ghost to scare neighbours
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे