लय भारी! नको तिथे स्पर्श करताच महिला खवळली; पाहा व्हिडिओ...

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्स महिलेची प्रशंसा करत असून, प्रत्येक मुलीने असेच धाडस दाखवायला हवे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

लंडन : एक महिला सायकलवर प्रवास करताना असताना ती एका मोटारीजवळ आली. मात्र, याचवेळी मोटारीमधील एकाने महिलेला बॅड टच केला. या स्पर्शामुळे महिला खवळली आणि तिने युवकांची धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध मॉडेलची घरात घुसून निर्घृण हत्या...

बलात्कार, छेडछाड यासारख्या महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत घडतात. पण, या घटनेमध्ये महिलेने टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून नेटकरी महिलेची प्रशंसा करत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, 'बॅड टचमुळे महिला कारमधील चांगलीच खवळली आहे. तिने रागात येऊन जवळ असलेली सायकल थेट मोटारीवर फेकली. त्यानंतर मोटारीमधील युवकाला राग आला आहे. तो रागात मोटारीमधून बाहेर येतो. मात्र, मोटारीमधून बाहेर येताच महिलेने जोरात लाथ मारली. शिवाय, मोटारीमध्ये बसलेल्या दुसऱ्या तरुणालाही तिने अशाच प्रकारे धडा शिकवला. एकूण तीन तरुणांची धुलाई करुन टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडवली आहे.'

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्स महिलेची प्रशंसा करत असून, प्रत्येक मुलीने असेच धाडस दाखवायला हवे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नियोजनबद्ध पद्धतीने शूट केल्याचे काही नेटकरी म्हणत आहेत. पण या व्हिडीओमध्ये जो संदेश देण्यात आला आहे, तो अतिशय चांगला असून, महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

व्हायरल! तिन्ही जुळ्या बहिणी एकाच वेळी गर्भवती...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: women biting youth who tried to touch her video went viral o
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे