धक्कादायक! पोलिस कर्मचाऱ्याच्या दारासमोर महिला कर्मचाऱ्याने घेतले पेटवून...

अचानक इमारतीतील एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसल्याने परिसरातील रहिवाशांनी त्या फ्लॅटच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक अनोळखी महिला फ्लॅट क्रमांक F2 च्या दरवाज्यासमोर जळत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसले.

वर्धा : पिपरी मेघे येथील पोलिस वसाहतीमधील क्वार्टरमध्ये (wardha police Quarters) एका महिला गृहरक्षकाने (Female police home guard  ) पोलिस कर्मचाऱ्याच्या घरासमोर जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला गृहरक्षकाने पोलिस कर्मचाऱ्याच्या दारासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्नाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

वर्धा शहरालगतच असलेल्या पिपरी (मेघे) येथील पोलिस कर्मचारी वसाहतीमध्ये LCB ला कार्यरत असलेले पोलिस शिपाई नवनाथ मुंडे यांच्या घराच्या दरवाज्यासमोर एका महिला होमगार्डने स्वतःवर पेट्रोल घेतले. रविवारी (ता. ९) संध्याकाळी ७.३० ते ८.०० वाजताचे सुमारास ही घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी वसाहत परीसरात असलेल्या शरद बिल्डिंगमध्ये हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. अचानक इमारतीतील एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसल्याने परिसरातील रहिवाशांनी त्या फ्लॅटच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक अनोळखी महिला फ्लॅट क्रमांक F2 च्या दरवाज्यासमोर जळत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसले.

हृदयद्रावक! नवविवाहित जोडपे खोलीत झोपायला गेले अन्...

नागरिकांनी तात्काळ आग आटोक्यात आणून महिलेला वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 60 ते 70 टक्के भाजली असून, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी तिला नागपूरला स्थलांतरीत केले आहे. संबंधित महिला ही होमगार्ड असल्याची माहिती सध्या प्राप्त झाली आहे. मात्र, तिने एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरासमोर स्वत:ला का जाळून घेतले? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन रामनगरचे ठाणेदार आपले पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करुन त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तिचा जबाब नोंदवता आलेला नाही. आज (सोमवार) दुपारी तिचा मुत्यू झाल्याचे पोलिस सुत्रानुसार कळते. त्यामुळे तिच्या या कृत्यामागचे नेमके कारण अद्याप तरी समजलेले नाही. मात्र, रामनगर पोलिस आता याचा तपास करत आहेत.

Bulli Bai App च्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिस कर्मचाऱ्यांना झाले तरी काय?
गेल्या चार दिवसांपूर्वी एका पोलिस शिपायाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांकडून कधी अपघात तर कधी मारामारी अशाप्रकारचे गुन्हे घडतांना दिसत आहेत, त्यामुळे रक्षकच भक्षक झाले की काय? याकडे प्रमुखांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे जेनेकरुन अशा प्रकाराची पुनराऊत्ती होऊ नये. शेवटी काय तर आपलेच दात आणि आपलेच ओठ...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: woman set herself on fire in wardha police quarters ramnagar
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे