कॅप्टन अभिनंदन यांचा 'वीर चक्र'ने सन्मान, तर...

बालाकोट एअरस्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारी 2019 रोजी हवाई हल्ल्यात पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारी 2019 रोजी हवाई हल्ल्यात पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. नायब सुभेदार सोमबीर यांना जम्मू आणि काश्मीरमधील कारवाईदरम्यान A++ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल मरणोत्तर शौर्य चक्रने सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणारे मेजर विभूती शंकर धौंडियाल यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवाद्यांना अटक अन्...

कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र, शांतता काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांना हुसकावून लावले होते. लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त), अभियंता-इन-चीफ लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, दक्षिण नौदल कमांडर व्हाईस अॅडमिरल अनिल चावला यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले जाईल. दुसरीकडे, ईस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल दिलीप पटनायक यांना अति विशिष्ट सेवा पदक प्रदान आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 2019 साली झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांच्या पत्नी नितिका कौल या 29 मे 2021 भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. नितिका भारतीय लष्करात लेफ्टनंट झाल्या आहेत. नितिका यांनी 29 मे रोजी भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करून शहीद मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली होती. 17 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवादी हल्ल्यात मेजर विभूती शंकर धौंडियाल हुतात्मा झाले होते.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या...

काश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा...

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात होते. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. मात्र, भारतीय हवाई दलानं त्यांना पिटाळून लावले. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन (आता ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत) पाकिस्तानचे एफ-१६ विमान जमीनदोस्त केले. त्यानंतर त्यांचंही विमान कोसळले. ते पाकव्याप्त काश्मीरमधील काही स्थानिकांच्या तावडीत सापडले. सुदैवाने त्यांची काही तासांमध्ये सुटका झाली.

बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांना याच महिन्यात प्रमोशन मिळाले आहे. एअर स्ट्राईकच्यावेळी विंग कमांडर असलेल्या अभिनंदन वर्धमान यांना ग्रूप कॅप्टनची रँक देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एफ-१६ या फायटर विमानांना प्रत्युत्तर देणाऱ्या अभिनंदन यांना याआधी शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आहे. अभिनंदन यांनी बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर देत पाकचं अमेरिकन बनावटीचं एफ-१६ फायटर विमान पाडलं होतं. विशेष म्हणजे मिग-२१ विमानातून उड्डाण करणाऱ्या अभिनंदन यांनी एफ-१६ जमीनदोस्त केलं. मिग-२१ च्या तुलनेत एफ-१६ अत्याधुनिक मानलं जातं. मात्र अभिनंदन यांनी मिग-२१ च्या मदतीनं एफ-१६ पाडत पाकिस्तानी हवाई दलाला दणका दिला.

अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: wing commander captain abhinandan varthaman awarded vir chak
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे