साप्ताहिक राशीभविष्य

29 जून ते 5 जुलै

नोकरीतील जैसे थे परिस्थिती राहील. सरकारी कर्मचारी वर्गाला मात्र दुविधा अवस्थेतून जावे लागेल. कामांवरील जबाबदारी पार पाडावी लागेल. काही गोष्टी विलंबाने होऊ शकतात.

मेष : जबाबदारी पार पाडावी लागेल
नोकरीतील जैसे थे परिस्थिती राहील. सरकारी कर्मचारी वर्गाला मात्र दुविधा अवस्थेतून जावे लागेल. कामांवरील जबाबदारी पार पाडावी लागेल. काही गोष्टी विलंबाने होऊ शकतात. मात्र, कामांवरील जुना अनुभव विसरू नका. आर्थिक बाबतीत चणचण भासेल. चणचण भासली तरी मार्ग काढून पुढे जा. कुटुंबासमवेत स्वच्छंदी राहण्याचा प्रयत्न करा. शारीरिक व मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.

वृषभ : अनावश्यक बोलणे टाळा
नोकरदार व्यक्तींनी मनाची शक्ती वाढवा. थोडे दिवस अजून कसर भरून काढावी लागणार आहे. त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. मात्र, गरज आहे तिथेच बोला. अनावश्यक बोलणे टाळा. पशांचा तिढा सुटणारा आहे. पशांचा व्यवहार मात्र योग्य पद्धतीने करा. मुलांविषयी असलेली चिंता कमी होईल. मुलांना वेळ देणे सहज शक्य होईल. कुटुंबाशी मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीचे स्वास्थ्य जपा.

मिथुन : कामांतील उत्साह वाढेल
नवा उत्पन्नाचा स्रोत चालू राहील. नव्याने वेग आल्याने कामांतील उत्साह वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे वर्चस्व राहणार आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार तजवीज करावी लागेल. पोलिस अधिकारी, लष्करी अधिकारी, वैद्य यांना असणारी अडचण कमी होईल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल, पण खर्चाची बाजू सांभाळता आली पाहिजे. खर्चीक गोष्टींना आळा घाला. जोडीदारासमवेत वेळ घालवणे शक्य होईल. घरगुती प्रश्नांची मालिका कमी होईल. शारीरिकदृष्टय़ा चांगले बदल घडून येतील.

कर्क : खर्च करत बसू नका
नोकरीत मात्र उठाठेव करणारा काल संपून जाईल व अपेक्षित परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत मात्र आवक समाधानकारक असेल. पुढील काही गरजा भागवण्यासाठी आताच खर्च करत बसू नका. सामाजिक स्तरांवर घेतलेले निर्णय पार पाडावे लागतील. अचानक मित्रांची मदत त्वरित मिळेल. मुलांच्या आरोग्याची उत्तम काळजी घ्याल. उपासनेत मन रमेल. आरोग्याची जीवनशैली उत्तम असेल.

सिंह : धनाचा प्रश्न कमी होईल
तुमच्यातील सुप्त गुणांना वाव मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. इतरांवर असलेला कामाचा ताण तुम्ही कमी करू शकाल. तुमची तर्कशक्ती प्रश्न सोडवणारी असेल. धनाचा प्रश्न कमी होईल. अपेक्षित प्राप्ती मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमची कारकीर्द उत्तम असेल. कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे असेल. खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळा व काळजी घ्या.

कन्या : आर्थिक घडामोडी चांगल्या राहतील
कायमस्वरूपी नोकरीचा प्रस्ताव तुमच्यापुढे येईल. त्यासाठी तुमची निवड होईल. उच्च अधिकारी व्यक्तींची साथ मिळेल. प्रशासकीय कामांतील अडथळा कमी होईल. आर्थिक घडामोडी चांगल्या राहतील. पशांचा व्यवहार करताना नि:संकोचपणे कराल. नातेवाईक तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक करतील. कुटुंबातील अवघड वाटणारी जबाबदारी कमी होईल. आरोग्याचा त्रास कमी होईल.

तूळ : आर्थिक गुंतवणूक वाढेल
नोकरीतील पूर्वस्थिती कमतरता भरून काढणारी असेल. ज्या ठिकाणी तुमचे वास्तव्य होते त्याच ठिकाणी काम करण्याची मुभा मिळेल. बदलीचा प्रस्ताव सध्या तरी त्रासदायक ठरणार नाही. आर्थिक गुंतवणूक वाढेल; पण गुंतवणूक करताना काळजी घ्या. धार्मिक गोष्टींची आवड राहील. शारीरिक आरोग्य सदृढ राहील.

वृश्चिक : आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगावी
नोकरीच्या ठिकाणी तुमचे इच्छित ध्येय साध्य होईल. शंका-कुशंकांचे वादळ जणू संपणारे आहे. असा संकेत मिळेल. आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगावी. नुकसान होण्यापासून वाचेल. व्यवहार करताना काळजी घ्या. जुन्या मित्र-मत्रिणींशी संपर्क साधाल. जुन्या आठवणी मनाला आनंद देणाऱ्या ठरतील. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. प्रकृतीचे हित जपा.

धनू : फटकळ बोलणे टाळा
नोकरदार वर्गाला संतुलन सोडून चालणार नाही. वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारे राग-राग करू नका. त्यांचे मार्गदर्शन बरोबर आहे, असे समजून पुढे चला. फटकळ बोलणे टाळा. चांगल्या मित्रांची संगत करा. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. मानसिक व शारीरिक संतुलन योग्य ठेवा.

मकर : धावपळीचे कामसुद्धा तुम्ही चपळाईने कराल
नोकरदार वर्गाला ऐन वेळी गडबडीने काम करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी धावपळीचे कामसुद्धा तुम्ही चपळाईने कराल. यशस्वीरीत्या काम पूर्ण कराल. आर्थिक बाजू योग्य पद्धतीने हाताळा. खर्च करताना द्विधा अवस्था होऊ देऊ नका. सार्वजनिक माध्यमाद्वारे तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. प्रकृतीच्या बाबतीत काळजी घ्या.

कुंभ : जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील
नोकरदार व्यक्तींचा मोठा उत्साह वाढेल. अनेक अनपेक्षित जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील. त्या पूर्ण करणे तुमच्यासाठी मोठे आव्हान असेल. तुम्ही हार न मानता ते पूर्णत्वाला न्याल. लाभाचे प्रमाण उत्तम राहील. कुटुंबातील व्यक्तींशी तूर्तास वादाचा प्रसंग येऊ देऊ नका. इतर गोष्टींबरोबर आरोग्याचीही काळजी घेणे हिताचे राहील.

मीन : आर्थिक अडचण कमी होईल
नोकरीचा होणारा झोपाळा आता थांबण्याच्या मार्गी असेल. मानसिक त्रास पत्करून काम करणे शक्य होत नव्हते. पर्यायी गोष्टींपुढे काही मार्गच नव्हता. आता ती परिस्थिती न राहिल्याने कामाचा उत्साहदेखील वाढेल. आर्थिक अडचण कमी होईल. कुटुंबापासून काही कामानिमित्त लांब राहावे लागेल. खाण्याचा अतिरेक टाळा व आरोग्य जपा.

Title: weekly horoscope policekaka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे