साप्ताहिक राशीभविष्य...

22 जून ते 28 जून 2020

नोकरदार व्यक्तींनी नोकरीतील सुस्थिती बदलू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आज जे तुम्हाला करायचे आहे त्याची घाई आताच करू नका. त्यासाठी वेळ मिळणार आहे.

मेष : अपयश ही यशाची पहिली पायरी
नोकरदार व्यक्तींनी नोकरीतील सुस्थिती बदलू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आज जे तुम्हाला करायचे आहे त्याची घाई आताच करू नका. त्यासाठी वेळ मिळणार आहे. निवांतपणे वेळ काढून विचार करणे टाळा. मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या. ही संधी व्यावसायिक यशासाठी असेल. आर्थिकदृष्टय़ा बदल होतील. प्रकृतीचे स्वास्थ्य जपा.

वृषभ : नोकरीतील वर्चस्व चांगले
नोकरीतील प्रस्ताव लक्षात घ्या. त्यानुसार निर्णय घ्या. नोकरीतील वर्चस्व चांगले राहील. आर्थिक फायदा चांगला राहील. आर्थिक प्रश्न सुटल्याने मनाला उभारी मिळेल. नातेवाईकांशी बऱ्याच दिवसांनी संपर्क साधाल. संपर्कातून अनेक आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. कुटुंबातील वातावरणाची गोडी वाढवा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आरोग्याचे प्रश्न कमी होतील.

मिथुन : मोठय़ा संधीची वाट पाहू नका
नोकरीतील हाताबाहेर असलेली परिस्थिती आता आवाक्यात येईल. मोठय़ा संधीची वाट पाहू नका. सध्याची चाललेली परिस्थिती चांगली समजून पुढे जा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशांच्या अडचणी कमी होतील. सामाजिक क्षेत्रात सर्वागीण विकासांवर भर द्याल. तो यशस्वी पार पाडाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. धार्मिक गोष्टीत मन रमवाल. आरोग्याच्या बाबतीत मात्र दुर्लक्षित वागणे टाळा.

कर्क : थोडे कष्ट वाढवावे लागतील
नोकरदार वर्गाला थोडे कष्ट वाढवावे लागतील. कामातील त्रुटी भरून काढाव्या लागतील. प्रत्येक पाऊल घाईचे टाकून चालणार नाही. वेळापत्रक आधी ठरवावे लागेल. घरगुती वातावरण उत्तम ठेवण्याचा प्रयत्न असेल. वैवाहिकदृष्टय़ा जोडीदाराचा सल्ला घ्या. तो हिताचा ठरेल. प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्या.

सिंह : नवी ओळख टाळा
शासकीय नोकरदार व्यक्तींना थोडा विरंगुळा मिळेल. अनेक दिवस कमी वेळेत काम पूर्ण करण्याची कसरत कमी होईल. थोडी विश्रांती मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यावसायिकदृष्टय़ा कलेची आवड जोपासाल. मित्रमंडळीचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या तक्रारी वाढणार नाहीत यांकडे लक्ष द्या.

कन्या : खर्चाला आवर घाला
नोकरदार व्यक्तींना ज्येष्ठांचा पाठिंबा चांगला राहील. तुमचे अधिकार वाढतील. सतत असलेला कामाचा ओघ पूर्णपणे पार पाडाल. जबाबदारी वाढल्याने कामाचे परिश्रम वाढतील. धनाचे नियोजन मात्र पक्के करा. खर्चाला आवर घाला. अनपेक्षित मित्र-मत्रिणींची मदत मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य जपा. प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ : वरिष्ठ व्यक्तींकडून तुमचे कौतुक होईल
नोकरदार व्यक्तींच्या कामातील उत्साह वाढेल. नोकरीतील वरिष्ठ व्यक्तींकडून तुमचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. मनाचा विकास घडेल. ठरवलेल्या व्यावसायिक धोरणांचा चांगला पगडा राहील. आर्थिक जबाबदारी उत्तमपणे पार पाडाल. पैशांची रेलचेल चांगली राहील. मित्रांना असणारी अडचण तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न कराल. नातेवाईक तुमच्या प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतील. आध्यात्मिक उत्साह वाढेल. आरोग्य ठणठणीत राहील.

वृश्चिक : जबाबदारी वाढण्याचे संकेत
नोकरीतील संभाव्य गोष्टी लक्षात घ्या. ठोकताळ्याचा वापर करा. त्याचबरोबर बौद्धिक क्षमता वाढवा. तुमच्यावर जबाबदारी वाढण्याचे संकेत आहेत. ही जबाबदारी एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुमच्यावर सोपवली जाईल. त्याचा तुम्हाला योग्य मोबदला मिळेल. कौटुंबिकदृष्टय़ा मात्र ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याचे प्रश्न कमी करा. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या.

धनू : आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगा
नोकरीतील हेवेदावे कमी होतील. आत्मिक संतुलन ठेवून काम कराल. हे करीत असताना बेसुरांचा सूर टाळण्याचा प्रयत्न असू द्या. समतोल साधणे हे तुमच्यासाठी उत्तम असेल. आर्थिक बाबतीत सतर्कता बाळगा. कौटुंबिक खर्च कमी करा. अनावश्यक बाबी टाळा. आरोग्याचे पथ्यपाणी पाळा. आरोग्य जपा.

मकर : उधार- उसनवार करणे टाळा
नोकरीतील बाकी कामाचा तपशील तुम्हाला मोठय़ा कौशल्याने सोडवावा लागेल. बोलण्यातील सडेतोडपणा कमी करावा लागेल. न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे. त्यासाठी मनाला आवर घाला. पैशांचा व्यवहार हा रोखीचा असू द्या. उधार- उसनवार करणे टाळा. खर्चीक गोष्टींना आवर घाला. कौटुंबिक गोडी टिकवण्याचा कल राहू द्या. वैवाहिक स्तरांवर जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याचा निष्काळजीपणा करू नका.

कुंभ : धनाचे नियोजन यशस्वी ठरेल
नोकरीच्या ठिकाणी गुलदस्त्यांतील गोष्ट उघड करू नका. स्पष्ट बोलण्याने मने दुखावली जाऊ शकतात याचा विचार करून बोला. त्यासाठी तुम्हाला तुमचा समजूतदारपणा वाढवायला हवा. धनाचे नियोजन यशस्वी ठरेल; पण बचतीचा मार्ग विसरून चालणार नाही. मिळालेल्या वेळेचा काही वेळ मुलांसाठी द्या. कुटुंबासाठी वेळ देता-देता स्वत:कडे दुर्लक्ष करू नका.

मीन : व्यवहाराला महत्त्व द्या
नोकरीतील चढ-उतार लक्षात घ्या. पळत्या गोष्टींच्या मागे फिरू नका. स्थिर अवस्था ठेवणे उत्तम राहील. एकंदरीत मनाचा विचार पक्का करा. आर्थिक गोष्टीत मात्र काळजी घ्या. नको असणाऱ्या गोष्टीत पैसे गुंतवणे टाळा. व्यवहाराला महत्त्व द्या. घरगुती स्तरांवर शांतता राखण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीस होणारा त्रास कमी होईल.

Title: weekly horoscope policekaka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे