वाहतूक शाखेची तुमच्यावर आहे करडी नजर; नियम तोडल्यास...

वाहतुकीचे नियम तोडणार्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कार्यवाही केली जाते. मात्र, सदर व्यक्तीकडून वारंवार वाहतूकीच्या नियंमांचे उल्लंघन होत असल्यास...

वर्धा: कुठलेही वाहन चालविण्यासाठी वाहतुकीचे काही नियम ठरवून दिलेले असतात. हे सर्व नियम वाहन चालविणाऱया व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठीही आहेत, असे असतांनाही बहुतेकवेळा नियम तोडून वाहन चालविले जाते. यामुळे अपघात घडत असतात. यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणार्यावरती दंडाची कार्यवाही केली जाते.

देशात बॉम्बस्फोट घडवण्याच्या मोठा कट लावला उधळून...

वाहतुकीचे नियम तोडणाऱयाचे लायसन्स सुध्दा रद्द केले जाऊ शकते. वाहन चालविणार्यावर वाहतूक शाखेची नजर असून, नियम तोडल्यास लायसन्स रद्द होऊ शकते.
नियम तोडल्यास होऊ शकते लायसन्स रद्दची कार्यवाही...
१) वाहन चालवितांना मोबाईलचा वापर तसेच अतिवेगाने वाहन चालविणे
२) मद्यपान तसेच अंमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालविल्यास अथवा सिग्नल मोडल्यास
३) मालवाहु वाहनातून प्रवासी वाहतुक केल्यास अथवा अवैधरित्या प्रवासी वाहतुक केल्यास

वाहतुकीचे नियम तोडणार्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कार्यवाही केली जाते. मात्र, सदर व्यक्तीकडून वारंवार वाहतूकीच्या नियंमांचे उल्लंघन होत असल्यास परिवहन विभागास अहवाल पाठवुन लायसन्स रद्दची कार्यवाही केली जाऊ शकते.

मुंबईतील अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांचा मोठा निर्णय...

नियमांचे पालन करा
वाहतूकीचे नियम हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. वाहतूकीचे नियम तोडून वाहन चालविल्यास त्याचे द्रुष्परीणाम आपल्याला अपघाताच्या स्वरुपात दिसून येतात. म्हणून यापुढे नियंमांचे पालन करुनच वाहन चालवा.

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

वाहतूक शाखेची तुमच्यावर करडी नजर असून, नियम तोडल्यास कार्यवाही नक्कीच होणार आहे, असे वर्धा वाहतूक शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी 'पोलिसकाका' सोबत बोलताना सांगितले. आतापर्यंत जानेवारी २०२१ ते आजपावेतो एकूण १५ प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले असून, त्यातील १२ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha traffic news traffice rules and police action driving
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे