Video: पोलिसकाकांनी जीवाची पर्वा न करता वाचवले दोघांचे प्राण...

पोलिसकाकांमुळे दोघांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कारंजा घाडगे (वर्धा): पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून जात असताना कारंजा पोलिस देवदूत म्हणून धावून आले. पोलिसकाकांमुळे दोघांचा जीव वाचला असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कारंजा तालुक्यात सर्वत्र धो-धो मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तालुक्यातील सर्व नदी नाले मुसळधार पावसाने तुडुंब भरून वाहू लागले होते. सर्वच ठिकाणी जवळपास पूर सद्रुष्य स्थिती निर्माण झाली होती. कारंजा पोलिस स्टेशनचे हद्दीतून कारंजा शहरात आठवडी बाजार निमित्ताने तालुक्यातून खेड्यापाड्यातून नागरिक हे बाजाराकरिता शहरात आले होते. तालुक्यातील बोंदरठाणा येथील खरकाडी नदीला आलेल्या पुरात मेघराज बापूराव खवशी (वय वर्षे 72 रा. बोंदरठाणा) व त्यांचा भाचा राहुल जनार्दन देवासे हे वाहत जात होते. पण, अचानक झाडाला अडल्याने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. हे दोघेही कांरजा येथील बाजार आटोपून दुचाकीने गावाकडे जात होते. पण, पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी या पुरातून दुचाकी घातली आणि त्यात ते दोघेही दुचाकीसह वाहून गेले. 

पुलापासून जवळपास 200 मीटर अंतरावर असलेल्या  झाडाला अडल्यामुळे ते दोघही झाडावर बसले. सदर माहिती गावचे पोलिस पाटील यांनी पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांना दिल्यानंतर त्यांनी उपस्थित पोलिस कर्मचारी यांचेसोबत घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर प्रशासनाने बचावकार्य राबवून दोघांनाही सुखरुप बाहेर काढले.  

सिने स्टाईल सापळा रचून वाहन पकडल्यावर मिळाले मोठे घबाड...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: wardha rain news wardha police save two people at flood and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे