वर्धा सायबर सेलने शोधले हरवलेले लाखो रुपयांचे मोबाईल...

मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे.

वर्धा: वर्धा सायबर सेलने हरवलेले लाखो रुपयांचे मोबाईल शोधून पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्या आदेशानुसार मुळ मालकास परत केले आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांना पोलिसांचे आभार मानले.

'मै कराची से बोल रहा हु। तुने अपना काम बढा लिया...'

मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र, अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे. अनेकवेळा मोबाईल नकळत हरवतात. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढलेले आहे. महागडे अन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नाराजी पसरते. नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवून कसे देता येतील याची योजना पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी आखली होती.

मी डॉन आहे, तू डॉनला जेवणाचे पैसे मागतो का?...

सदरची जबाबदारी सायबर सेल, वर्धा यांना देण्यात आली होती. त्यावरुन सायबर सेल पथकाने दैनंदिन कामकाज सांभाळून हरविलेल्या मोबाईलचे शोध घेण्याचे आदेश प्राप्त होताच पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी व सायबर सेल वर्धा चे पथकाने मोबाईल फोनचे शोध कार्य सुरु केले. सदर शोध मोहीम दरम्यान चालू वर्षात वर्धा जिल्ह्यात हरविलेले मोबाईल पैकी वर्धा जिल्ह्यातून व आजूबाजूचे जिल्ह्यातून एकूण १०८ मोबाईल एकूण ११ लाख २०००० रुपयांचे हस्तगत करण्यात आले. सदरचे मोबाईल हे त्यांचे मुळ मालकांना परत करणे करीता त्यांचेशी संपर्क करण्यात आला व पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे मुळ मालकांना बोलावून त्यांना सुपुर्त करण्यात आले.

मोटार सायकलवर येऊन एका विवाहित शिक्षिकेचा विनयभंग अन्...

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक महेन्द्र ईंगळे स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, पोलिस अंमलदार निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, प्रकाश गुजर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, अंकित जिभे, शाहिन सैय्यद, स्मिता महाजन सर्व सायबर सेल वर्धा यांनी केली.

धक्कादायक! महिला डॉक्टरच्या बेडरुममध्ये सापडला स्पाय कॅमेरा...

प्रेमविवाह झालेल्या पतीला खोलीत पाहिल्यावर बसला धक्का...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha police news wadha cyber cell find mobile and return t
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे