वर्धा जिल्हा पोलिस दलात चाललंय तरी काय?
ड्युटी पास आणि बरच काही…
एकावं ते नवलच आणि बघाव ते कुतुहलचं… असं सध्या वर्धा जिल्हा पोलिस दलात चाललंय. जे घडतंय ते ठरवुन की वरीष्ठांना याचा थांगपत्ताच लागत नाही.वर्धा: एकावं ते नवलच आणि बघाव ते कुतुहलचं… असं सध्या वर्धा जिल्हा पोलिस दलात चाललंय. जे घडतंय ते ठरवुन की वरीष्ठांना याचा थांगपत्ताच लागत नाही.
पोलिसकाका ला मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात वर्धा जिल्हा पोलिस दलात ड्युटी पास नावाच्या शस्त्राचा वापर सर्यास होताना दिसतोय. त्यात अग्रस्थानी आहेत ते अधिकारीच! कारण अधिकार्यांनाच असे कर्मचारी ड्युटी पास वर आपले सेवेत हवे असतात अशी अनेक उदाहरणे जिल्हयात देतां येतील. परंतु, महत्वाच पद सांभाळणाऱया स्थानिक गुन्हे शाखेतील मुखीया जर असे करत असतील तर बाकीच्यांची कुनाकडे बघायचे?
खात्रीशीर माहिती नुसार असे कळते की काही दिवसांआधी एका पोलिस कर्मचार्याचे रेड कारपेट वेलकम झालंय म्हने का तर हा कर्मचारी आधी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांच्या आधीच्या नियुक्तीच्या ठिकाणी त्यांचा लेखनिक वजा सर्वकाही होता म्हणे आता हा कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत साहेबांच्या मर्जीतील झाल्याने, कानामागून आला आणि शहाणा झाला... या म्हणीप्रमाने येथे गेले क्रित्येक वर्षापासुन येथे काम करीत असलेल्या कर्मचारी वर्गाच्या पोटात गोळा आल्याने दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
आता मुद्दा असा आहे की आधिच पोलिस स्टेशनला कमी मनुष्यबळ त्यातही अधिकारी आपले मर्जीतील कर्मचारी ड्युटी पासवर आपलेकडे वर्षानुवर्ष आपल्या दिमतीला ठेवून घेतात जर याची खरच गरज असेल तर यात वावगं काहीच नाही. परंतु, जे कर्मचारी ड्युटीपास वर बोलावले जातात ते काय काम करतात हे वेगळे सांगायच गरज नाही व तसे पुरावे सुध्दा पोलिसकाकाच्या हाती लागलेत आता हे सर्व वरीष्ठाना विश्वासात घेऊन केल जातय की त्यांना अंधारात हे समजायला हवय कारण स्थानिक गुन्हे शाखेत साहेबांच्या विश्वासातील एक कर्मचारी अस्स काय काम करु शकतो की जे येथे आधीपासूनच नियुक्त कर्मचारी करु शकत नाही ?
या सर्व संदर्भात पोलिसकाका न्युज ने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक यांचेशी संपर्क केला असता त्यांच्याकडुन कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आता ज्यांनी हे कर्मचारी दिमतीला बोलवले तेच उत्तर देनार नसतील तर…ये पब्लिक है सब जानती है….
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...