आता डायल करा ११२! १०व्या मिनिटाला मिळणार वर्धा पोलिसांची मदत!

पोलिसांची तातडीची सेवा हवी असल्यास नागरीकांनी १०० ऐवजी ११२ हा क्रमांक डायल करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी केले आहे.

वर्धा: पोलिसांची तात्काळ मदत हवी असल्यास १०० ऐवजी डायल करा ११२. पोलिस विभागाने तंत्रज्ञानावर आधारीत ११२ हा क्रमांक अंमलात आणला आहे. जिल्ह्यात ११२ ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. ११२ क्रमांक डायल करताच शहरी भागांत १० मिनिटात व ग्रामीण भागांत १५ मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की...

वर्धा जिल्ह्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या योजनेनुसार वर्धा जिल्हा पोलिस दलातील सर्व चारचाकी दुचाकी वाहनांना मोबाईल टर्मिनल बसविण्यात आले आहेत. या योजनेत वर्धा जिल्हा पोलिस दलास २१ चारचाकी बोलेरो व ५ दुचाकी वाहन प्राप्त झाले आहे. त्यात दुचाकीवर बिट मार्शल तसेच दामीनी पथक व पोलिस पथक तातडीने लोकेशन घेऊन घटनास्थळी दाखल होतील. या योजनेकरीता वर्धा जिल्हा पोलिस दलातील २८२ अधिकारी व कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संशयास्पद! आदित्य चोपडा याची हत्या की आत्महत्या?

कुठल्याही क्षणी ११२ ला कॉल आल्यास कॉल करणाऱया संबंधीत व्यक्तींचे लोकेशन अवघ्या काही सेकंदात कळणार आहे. एखाद्या तक्रारदाराने ११२ या क्रमांकावर कॉल केल्यास तो कॉल नागपूर येथील कॉल सेंटरला जाईल तेथील प्रतिनीधी तक्रारदाराशी संवाद साधेल. ही सेवा सर्व भाषेत उपलब्ध असल्याने तक्रारदारास भाषेची अडचण येणार नाही.

बापरे! तब्बल 21 महिलांवर बलात्कार अन् हत्या; पाहा शिक्षा...

'वर्धा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात डायल ११२ ही योजना २७ सप्टेंबर पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याकरीता २१ चारचाकी व ५ दुचाकी वाहने सज्ज झाली आहेत. प्रशिक्षित पोलिस कर्मचारी आपणांस तात्काळ सेवा देण्यास सज्ज झाले आहे. पोलिसांची तातडीची सेवा हवी असल्यास नागरीकांनी १०० ऐवजी ११२ हा क्रमांक डायल करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी केले आहे.

चिमुकलीला उपचारासाठी हवाय तुमच्या मदतीचा हात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha police news dial 112 for emergency help to people an
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे