पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश...

पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर प्रयत्नांना यश आले आणि पालकमंत्रांच्या हस्ते पोलिस कल्याननिधी पेट्रोल पंपाचे भुमीपुजन करण्यात आले.

वर्धा : वर्धा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, पालकमंत्रांच्या हस्ते पोलिस कल्याननिधी पेट्रोल पंपाचे भुमीपुजन करण्यात आले.

पोलिस कल्याणनिधी करीता मंजूर पेट्रोल पंपाचे भिजत धोंगडे...

पोलिस अधिक्षक वर्धा यांनी महाराष्ट्रभर असलेले पेट्रोल पंप या प्रकारात येतात अशावेळी योग्य ती खबरदारी घेऊन तेवढे दिवस पंपाचे सर्व व्यवहार हे बंद असतात असे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. शिवाय, पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर प्रयत्नांना यश आले आणि पालकमंत्रांच्या हस्ते पोलिस कल्याननिधी पेट्रोल पंपाचे भुमीपुजन करण्यात आले.

पोलिस विभागास जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 13 नविन चारचाकी वाहनाचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण व पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, सर्वश्री आमदार अभिजित वंजारी, रणजित कांबळे, दादाराव केचे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,  जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, वाहन शाखाप्रमुख पोलिस निरिक्षक महेश मुंढे, राखीव पोलिस निरिक्षक शालिक उईके व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक करणारे मुद्देमालासह ताब्यात

जिल्हा वार्षिक योजना 2020- 21 च्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून 13 वाहने खरेदी करण्यात आले आहे. यापूर्वी 8 वाहने असे एकूण 21 वाहने पोलिस विभागास प्राप्त झाली आहे. सदर वाहने जिल्हयातील 19 पोलिस स्टेशनला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे पोलिस विभागाचे वाहन शाखा प्रमुख श्री. मुंढे यांनी सांगितले.

राज कुंद्राच्या गुन्हेगारी प्रकरणांची पाहा यादी...

यावेळी मान्यवरांचे हस्ते पोलिस मुख्यालयातील मैदानावरील जागेवर नव्याने बांधण्यात येणा-या पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha news sp prashant holkar police kalyannidhi petrol pum
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे