संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

पीडित महिला ही घरच्या शेतात पराटी पिकाच्या निंदणासाठी गेली होती. त्यावेळी महिलेचे लहान जावई सोबत होते.

वर्धा: शेतामध्ये पुतण्याने 45 वर्षीय काकूवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दहेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घडली आहे. या घटनेमुळे जिल्हाभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पीडित महिला ही घरच्या शेतात पराटी पिकाच्या निंदणासाठी गेली होती. त्यावेळी महिलेचे लहान जावई सोबत होते. निंदण झाल्यावर जावई जेवण करण्यासाठी घरी गेले तेव्हा महिला शेतात एकटी होती. काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला आणि महिलेसोबत बळजबरी करू लागला. महिलेचे तोंड दाबून तिच्यावर जबरीने अत्याचार केला आणि आरोपी पळून गेला. पीडित महिलेच्या शेताला लागून तिच्या मोठ्या दिराचे शेत आहे. त्या शेतात तिला मोठे दीर बैल चारताना दिसले आणि तेव्हा त्यांना पीडित माहिलेने घडलेला प्रकार सांगितला. 

पीडित माहिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर थेट दहेगाव पोलिस ठाणे गाठले आणि तिच्या आरोपी पुतण्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.  पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: wardha district crime news women torcher at farm register co
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे