एटीएममध्ये छेडछाड करून पैसे काढणारे उत्तर प्रदेशातून अटकेत...

आरोपीचा पो स्टे हिंगणघाट तर्फे पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून, आरोपीकडून वर्धा व इतर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वर्धाः स्टेट बॅंक ऑफ इंडीया च्या एटीएम मशीनमध्ये तांत्रीक छेडछाड करुन 4,54,000 रुपये काढणाऱया आरोपीस उत्तर प्रदेशातून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश आले आहे.

व्हायरल! खासदार संजय राऊत काय गुंड आहेत का ?

३०-०८-२०२१ रोजी फिर्यादी विवेक सिंग नारायण सिंग (वय ३६, रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट) यांनी पो स्टे हिंगणघाट येथे तक्रार दिली की, अनोळखी व्यक्तींनी एस.बी.आय या बॅंकेचे ए.टी.एम मशीनमधे छेडछाड करून 4,54,000 रुपये काढले आहेत. पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नेांद करण्यात आला.

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी काय मिळाले होते पाहा....

सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आला असून, सदर गुन्ह्यामध्ये संपूर्ण तांत्रिक माहिती काढण्यात आली. मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून यातील नमूद आरोपी हे जिल्हा मोहबा राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून तत्काळ पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा व सायबर शाखा येथील पथक तयार करून जिल्हा मोहबा (उत्तर प्रदेश) येथे रवाना करण्यात आले. ०१-०९-२०२१ रोजी पथक मोहबा येथे पोहचून आरोपीची ओळख पटवली. १) नीरज नाथूराम निषाद (वय १९), २) विधी संघर्षित बालक (दोन्ही रा. बजरंग चौक, मोहबा, उत्तर प्रदेश) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ४० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम, ७ मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर असा एकूण 5,92,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीचा पो स्टे हिंगणघाट तर्फे पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून, आरोपीकडून  वर्धा व इतर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लक्ष द्या! तुमच्या सीमकार्डची मुदत संपली आहे...

सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरिक्षक गोपाल ढोले, पोलिस अंमलदार स्वप्नील भारद्वाज, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, विकास अवचट, संघसेन कांबळे विशाल मडावी, अक्षय राऊत, अंकित जीभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन सायबर सेल वर्धा यांनी केली.

औषध बनविणाऱ्या कंपनीलाच घातला ऑनलाईन लाखोंचा गंडा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha crime news wardha police arrested at up for atm robbe
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे