पोलिस अधिक्षक यांच्या कर्तुत्वाला काळीमा!!

सेवाग्राम पोलिस स्टेशनचे हद्दीतील खुल्या बारला व पवनार येथील जुगाराला ठाणेदार व स्थानिक गुन्हे शाखेचा छुपा पाठिंबा...

वर्धा: सेवाग्राम पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा हेच मलीन करताय पोलिसांची प्रतीमा!! सेवाग्राम पोलिस स्टेशनचे हद्दीतील खुल्या बारला व पवनार येथील जुगाराला ठाणेदार व स्थानिक गुन्हे शाखेचा छुपा पाठिंबा...

सेवाग्राम पोलिस स्टेशनचे हद्दीत नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धा शहराला लागून असलेल्या महामार्गावरील कारला बस स्टॅंड च्या मागील बाजूस असलेल्या सुभाष नावाच्या व्यक्तीच्या खुल्या बारला सेवाग्राम पोलिसांचा व स्थानिक गुन्हे शाखेचा खुला पाठिंबा. त्याच प्रमाणे यांनी विनोबा भावे यांचे पदस्पर्शाने पावण झालेल्या पवनार सारख्या पवित्र भुमीला सुध्दा सोडले नाही तेथेही पवनार गावातून दर्गाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूलाच बबलू, राकेश व मुन्ना नावाच्या व्यक्तीला जुगार व चेंगळ भरविण्याचा अलिखित परवाणाच दिला की काय जणू? यांवर ठाणेदार सेवाग्राम यांची व स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांची एवढी मेहेरनजर का? कारण यातून होणारा अर्थपुर्ण व्यवहार, महिनाभरापुर्वी माध्यमांनी ही बाब संबंधीतांना कळवताच तीन दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेला जाग आली व त्यांनी सदर ठिकाणी धाड टाकली. पण तात्पर्य काय येथे पोहचण्या तत्पुर्वी कुनीतरी या धाडेची खबर संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहचविल्याची खासगीत चर्चा आहे आणि ही खबर पोहचताच संबंधीत ठिकाणी असणारा देशी विदेशी दारुचा साठा अन्य ठिकाणी हलविण्यात आला व आणि येथे भली मोठी गर्दी जमविणार्या खुल्या बारमधे फक्त आणि फक्त सर्व कंपनीचे धरुन २५००० रुपयांचा मुद्देमाल सापडावा यामागचे एकमेव कारण म्हणजे पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहार त्याशिवाय का अशा ठिकाणी पोलिस ३ दिवसांनी पोहचतात.

पोलिस स्टेशन वर्धा शहर आणि बरचं काही...

याहीपेक्षा भयंकर म्हणजे आमचे संपादक यांनी ठाणेदार महोदयांना व तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांना हा खुला बार सुरु झाल्याबाबत कळविले असता स्थागुशा प्रमुख म्हणतात ठाणेदारांना कळवा तसेच ठाणेदार म्हणतात डी बी पथकास कळवितो असे सांगीतले जाते. आता तर म्हने ज्यांचेवर दारुबंदी केसेस करण्याची जबाबदारी आहे तेच २ कर्मचारी दारुचे अवैध धंदे करणार्यासोबत भागीदारी करतात? अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. यावरुन या परीसरात राहणार्या व ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी योग्य तो बोध घ्यावा की खरच हा खुला बार कायमचा बंद व्हावा, असे ठाणेदार साहेबांना अथवा स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांना वाटते का?

काही दिवसापुर्वी नव्याने रुजू झालेले शिस्तप्रिय अधिकारी विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परीक्षेत्र यांचे आदेश धडकले की आपले जिल्ह्यात अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. त्यानुसार पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक यांनी यांवर कार्यवाही करण्यास सांगताच लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथके इतर पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाया करण्यास सरसावले आणि त्या केल्या देखील. हे कर्तव्यतत्परता उल्लेखनीय. परंतु, वर्धा शहर व लगतच्या पोलिस स्टेशन हद्दीत कुठेलेही अवैध धंदे सुरु नाहीत, असे अधोरेखीत करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख व त्यांचे घनिष्ठ असलेले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक करतायत असे दिसून येते. याकडे पोलिस अधिक्षकांनी निच्छितच लक्ष द्यायला पाहीजेच.

स्थानिक गुन्हे शाखा आणि सुचनापत्र; मोह की माया...?

आलोडी येथील संज्या, वरुड येथील सुधीर, चितोडा येथील रनधीर तसेच बरबडी येथील २ बंधू हे मोहा, देशी, विदेशी दारुचे मुख्य स्त्रोत हेही ठाणेदार साहेबांना दिसू नये, असे कसे शक्य आहे. कारण ठाणेदार हे पुर्वाश्रमीचे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख हे सुध्दा विसरुन चालनार नाही. समजा नव्याने रुजू झालेले स्थागुशा प्रमुखांना कदाचित याबद्दल माहिती नसावी. परंतु, त्यांच्या दिमतीला व त्यांची मर्जी सांभाळणार्यांना पण याची कल्पना नसावी, हे आश्चर्यच. त्याच प्रमाणे उपविभागिय पोलिस अधिकारी यांनी सुध्दा याकडे लक्ष द्यावे. कारण वर्धा शहर हद्दीप्रमाणेच हे पोलिस स्टेशन सुध्दा त्यांच्याच अधिकारक्षेत्रात येतय!

हे जर का असेच सुरु राहीले तर पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक यांनी कर्तुत्वावर मिळवलेली प्रतीमा त्यांचे अधिकारी नक्कीच मलीन करतील यांत तिळमात्रही शंका नाही! यापूर्वी त्यांनी दिलेल्या लेखी आदेशाची अवहेलना व आता तर खुल्या बारला व विविध ठिकाणावर असलेल्या अवैध मोहा, देशी, विदेशी धंदा करणार्यांना स्थागुशा प्रमुखांनी व सेवाग्राम ठाणेदारांनी दिलेला छुपा पांठींबाच त्याशिवाय का हे शक्य आहे?

Title: wardha crime news wardha police and illegal liquor need acti
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे