स्थानिक गुन्हे शाखा आणि सुचनापत्र; मोह की माया...?

पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर याकडे लक्ष देतीलही. परंतु, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना सुचनापत्रावर सोडने योग्य की अयोग्य?

वर्धा: पाच दिवसांआधी स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्ह्यातील विविध भागांत अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांवर दारुबंदी कायद्या अंतर्गत धाडी टाकल्या. त्यापैकी जवळपास सर्वच आरोपींना अटक न करता सुचनापत्रावर सोडण्यात आल्याचे कळते. महत्वाची बाब म्हणजे ही की यांतील काही आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे संबंधीत पोलिस स्टेशनला नोंद आहेत.

आरोपी हा गुंड प्रवुत्तीचा असल्याने घाबरुन भितीपोटी तक्रार देत नव्हता...

काही आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासंबंधी प्रस्तावही पाठविण्यात आलेले आहेत. त्यांची स्वतःहाची गुंडांची टोळी असल्याचेही कळते. गणेशोत्सवादरम्यान गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींना सुचनापत्रावर सोडणे योग्य की अयोग्य? याचा खरच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांनी विचार करावा. जर त्यांना सुचनापत्रावर सोडले आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे अनुचीत कृत्य घडले तर त्याचे परीणाम काय होऊ शकतात याची कल्पना न केलेलीच बरी. 

पहाटेच्या अंधारात गुपचुप 15 दिवसांच्या मुलीस भेटायला आला अन्...

पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर याकडे लक्ष देतीलही. परंतु, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना सुचनापत्रावर सोडने योग्य की अयोग्य? याची मिमांसा होणे गरजेचे आहे. कदाचित कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला असावा. परंतु, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती नसावी हे आश्चर्य. त्याचप्रमाणे यातील बहुतांश आरोपी हे अवैध देशी-विदेशी दारुचे व्यापारी आहेत. त्यांचेकडे धाड टाकून फक्त २ पेटी अथवा ३ पेटी चा मुद्देमाल जप्त केल्याचे कळते. यावरुन सुध्दा संशय बळावतो आहे की, दारुचे व्यापारी आणि त्यांचेकडे फक्त २ पेटीची कारवाई? यावरुन असा कयास लावला जाऊ शकतो की ही केलेली कारवाई मागून घेतलेली असावी? त्यामागेही काही अर्थकारण तर नाही ना? अशी सुध्दा शंका व्यक्त होत आहे.

हृदयद्रावक! विहिरीतील दृष्य पाहून उपस्थित ठसाठसा रडले...

पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर व अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंखे यांनी पुर्ण गणेशोत्सवात जिल्हाभर कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेकडून झालेल्या या चुकीला ते निश्चितच पाठीशी घालणार नाहीत. शेवटी अधिकारी अथवा कर्मचारी चुकला तर त्याचे खापर हे प्रमुखांवरच फुटणार. परंतु, जिल्ह्याला लाभलेले पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक हे आपले काम ईमाने ईतबारे व नेटाने करत असताना कदाचित या सर्व कार्यवाया त्यांना अंधारात ठेऊन तर केल्या नाही ना?
(क्रमश:)

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha crime news wardha lcb and criminal casses write umesh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे