वर्धा जिल्ह्यात अवैध दारु वाहतूक करणारे मुद्देमालासह ताब्यात

समुद्रपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारुची वाहतूक करणाऱयास सहा लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

समुद्रपूर (वर्धा): समुद्रपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारुची वाहतूक करणाऱयास सहा लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

राज कुंद्राच्या गुन्हेगारी प्रकरणांची पाहा यादी...

ठाणेदार हेमंत चांदेवार यांना गोपनीय खबरीनुसार माहिती समजली होती की, पांढऱया रंगाच्या वाहनातून अवैधरित्या विनापरवाणा दारुची वाहतूक होणार आहे. त्यानुसार हेमंत चांदेवार यांचे आदेशानुसार पोलिस हवालदार निलेश पेटकर यांना आवश्यक त्या सुचना देऊन सोमवारी (ता. 19) दुपारी समुद्रपुर बायपास येथे नाकाबंदी करण्यास सांगितले. दुपारी ३.३० वा चे सुमारास एक मारुती सुजुकी ईको क्रमांक MH49 CA1974 ही मिळालेल्या वर्णनाची गाडी येताना दिसली. पोलिसांनी मोटार थांबवून गाडीची तपासणी केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा छिंदम अडचणीत...

मोटारीमध्ये एका खोक्यात १८० मिली च्या २००० प्लास्टिकच्या देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्याबाबत विचारणा केली असता सदरचा माल हा हिंगणघाट येथे नेत असल्याचे सांगितले. प्रशांत शेखर डोंगरे (वय २७, रा. गौतम वार्ड हिंगणघाट), सुरज रमणकुमार शर्मा (वय १९, रा. लेबर कॉलनी हिंगणघाट) या दोघां विरुध्द पोलिस स्टेशन समुद्रपुर येथे मुंबई दारुबंदी कायदा व मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

लातूरमध्ये एसपी निखिल पिंगळे यांची अवैध धंद्यांवर कारवाई...

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंखे, उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंत चांदेवार यांचे निर्देशानुसार पोलिस हवालदार निलेश पेटकर, विक्की मस्के, मनोज कोसुरकर व सलीम कुरेशी यांनी केली.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha crime news samudrapur police 2 arrest for illegal liq
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे