एकाने शासकीय शिक्के खोट्या सह्यांचा केला वापर अन्...

शासकीय शिक्के खोट्या सह्यांचा वापर करुन भुंखंड विकणाऱयास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रामनगर (वर्धा): शासकीय शिक्के खोट्या सह्यांचा वापर करुन भुंखंड विकणाऱयास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नायब तहसीलदार यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक १ची उल्लेखनीय कामगिरी...

सविस्तर माहीती अशी की, जयंत नामदेव कावळे यांनी तालुका वर्धा उमरी (मेघे) येथील सर्वे कं. 67/5, भुखंड 28 या प्लॉटचा अर्धा भाग विक्री करणे करीता त्या प्लॉटचा बांधकाम मंजुर नकाशा व बांधकाम परवानगी पत्र आशीष अभाटे यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी बॅंकेचे कर्ज घेणे करीता सदर बांधकाम परवानगी पत्र व नकाशा नगर रचना मुल्य निर्धारण विभाग वर्धा तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय वर्धा यांचे कार्यालयात जावून माहिती घेतली असता, सदर दोन्ही कागदपत्र या कार्यालयाचे नसल्याचे तसेच त्यावर नगर रचनाकार व उपविभागीय अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रा.प.उमरी मेघे, यांचे खोटी सही शिक्के मारून बनावट कागदपत्रे बनविले असल्याचे समजले.

जबरी चोरी आणि लुटमारीचा गुन्हा उघड करण्यात समुद्रपुर पोलिसांना यश

सदर बांधकाम मंजुरी आदेशातील जमीन ही आरोपी 
1. प्रविण कृष्णराव बोकडे 
2. शैलेश विठठलराव बहिरमवार यांचे मालकीची आहे.
तक्रारदार सुरेश बगळे उपविभागीय अधिकारी वर्धा जि. वर्धा यांनी सर्व संबंधित कार्यालयाकडून खात्री करून नायब तहसिलदार स्वप्निल दिगलवार यांना तकार दाखल करण्यास अधिकृत केले. फिर्यादी स्वप्नील वामनराव दिगलवार, धंदा नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जि. वर्धा यांचे तक्रारीवरून दि.20.05.2022 रोजी पोलिस स्टेशन रामनगर वर्धा येथे कलम 420, 465, 468, 471, 473, 34 भा. द. वी अन्वये आरोपी 
1. जयंत नामदेव कावळे
2. प्रविण कृष्णराव बोकडे 
3. शैलेश विठ्ठलराव बहिरमवार यांचे विरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे.

वर्धा जिल्हा पोलिस दलात चाललंय तरी काय?

सदर गुन्हयांचे तपासा दरम्यान आरोपी जयंत नामदेव कावळे यांनी बांधकाम नकाशा तयार करून सरकारी अधिकारी,नगर रचनाकार अधिकारी वर्धा, उपविभागीय अधिकारी वर्धा, ग्राम विकास अधिकारी, ग्रा.प. उमरी मेघे, वर्धा, यांचे खोटे सही शिक्के मारून बनावट बांधकाम मंजुरी आदेश तयार केले व शासनाचे शुल्क न भरता महाराष्ट्र शासनाची फसवणुक केली आहे. सदर अनाधिकृत बांधकाम झालेले घर कु. अंकीता ओमप्रकाश पांडे यांच्याकडून 15 लाख रूपये घेवून विक्री करारनामा केलेला आहे. सदर गुन्हयांतील आरोपी जयंत नामदेवराव कावळे (वय 53 वर्ष, व्यवसाय बांधकाम ठेकेदारी, रा. विघ्नहर्ता नगर सिंदी मेघे वार्ड क्र - 5 वर्धा) यास बुधवारी (ता. २२) संध्याकाळी 5.00 वा चे दरम्यान अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

घुग्गुस येथील IPL जुगार अड्डयावर छापा; मोठे मासे लागणार गळाला...

देशात हाहाकार माजविणाऱ्या 'इराणी' गॅंगचा पर्दाफाश...

बहुचर्चित भद्रावती येथील युवतीच्या हत्याकांडाची अंशत: उकल...

आता डायल करा ११२! १०व्या मिनिटाला मिळणार वर्धा पोलिसांची मदत!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक क

Title: wardha crime news ramnagar police one arrested for governmen
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे