बापरे! पोलिसांना मिनी ट्रॅव्हल्समध्ये डोकावल्यावर बसला धक्का...

एका मिनी ट्रॅव्हल्समध्ये डोकावल्यावर पोलिसांना धक्का बसला. याबसमध्ये १२ गोवंश जिवंत तर दोन गाई मृत आढळून आल्या.

वर्धा : एका मिनी ट्रॅव्हल्समध्ये डोकावल्यावर पोलिसांना धक्का बसला. याबसमध्ये १२ गोवंश जिवंत तर दोन गाई मृत आढळून आल्या. पोलिसांनी जनावरांची सुटका केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीला कर्ज काढून महागडा मोबाईल घेऊन दिल्यानंतर घडले भलतेच...

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या वर्ध्यातील बीडीएस पथकाने पाहणी करून गोवंशांची सुटका केली. आरोपी, मात्र पसार झाले आहेत. ही कारवाई २० तारखेला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Video: शिक्षकाने दारू पिऊन वर्गातच केली लघुशंका अन्...

वर्ध्यातील बॉम्ब शोधक पथक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर होते. पथक कारंजाकडून तळेगावकडे येत असताना सारवाडी नजीकच्या पारडी फाट्याजवळ रस्त्याकडेला एम.एच. ०६ एफ.के. ०९२१ उभी होती. पथकातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी मिनी ट्रॅव्हल्सची पाहणी केली. मोटारीमध्ये जनावरे अतिशय बिकट अवस्थेत कोंबल्याचे दिसले. यामध्ये १२ गोवंश जिवंत तर दोन गाई मृत आढळून आल्या. याची माहिती त्यांनी तत्काळ तळेगाव ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ट्रॅव्हल्स ताब्यात घेत गोवंशांना टाकरखेड येथील गोशाळेत पाठविले.

पोलिसांनी अचानक लॉजवर धाड टाकली अन् आढळल्या विद्यार्थीनींसह...

दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, परवेज खान, मनोज असोले, सुधीर डांगे, अमोल मानमोडे, विजय उईके करीत आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: wardha crime news police see mini travel bus and 20 cow in t
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे