बापरे! विम्यासाठी 1000 खताच्या पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली लपवली कार...

जवळपास 1000 खताच्या पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली ताडपत्रीने झाकून सदर कार लपवून ठेवलेल्या स्थितीत मिळून आली.

सावंगी मेघे (वर्धा): स्थानिक गुन्हे शाखेसह सावंगी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कार विम्यासाठी मालकानेच कार चोरीचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. 

सवीस्तर वृत्त असे की, 18/11/2021 रोजी सावंगी येथे राहणारे पॅट्रिक अखिलेश सिंग यांनी त्यांचे घरा जवळील खाली प्लॉट मध्ये त्यांचे मालकीची चौदा लाख रुपयांची कार पार्किंग करून ठेवली होती. रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेत चोरट्याने ती कार पळवली. सदर कार चा सर्वत्र शोध घेऊन ती मिळून न आल्याने फिर्यादी पो.स्टे. सावंगी येथे कार चोरीची तक्रार दिल्याने सदर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

उसतोड करताना मानवी सांगाडा आढळल्याने उडाली खळबळ...

सदर गुन्ह्याचा समांतर तपास पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन सावंगी मेघे करीत असतांना सदर गुन्ह्यात घटनास्थळावर जाऊन फिर्यादी यांचेकडून घटनाक्रम जाणून घेतला. कथन व घटना जुळत नसल्याने फिर्यादीवरच संशय बळावला. सदर गुन्ह्याची सखोल चौकशी केली असता खबरी द्वारे खात्रीची माहिती मिळाली कि सदर कार हि काही दिवस अगोदर पासूनच नमूद चोरीच्या ठिकाणी दिसलीच नाही. फिर्यादी यांचे घराजवळ वर्गिस मॅथ्यूज व पॅट्रिक सिंग काही दिवसांपूर्वी सदर कार मध्ये रात्रदरम्यान दिसले होते व ते कारमध्ये पुलगावच्या दिशेने सदर कारने जात होते. या माहितीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व तपास सुरू केला. 

तपासादरम्यान समजले कि वर्गिस मॅथ्यूज हे पुलगाव येथे एका कंपनीमध्ये मॅनेजर आहेत व सदर कार तिथे लपवून राहू शकते यावरून सदर कंपनीमध्ये वर्गीस मॅथ्यूज यांना सोबत घेऊन जाऊन कंपनीच्या आवाराची बारकाईने पाहणी केली. वर्गीस हे अतिशय घाबरलेल्या अवस्थेत पथकाच्या प्रश्नांना उत्तरे देत होते, संशय अजुन बळावल्याने कंपनीच्या आवराचा कोपरा न कोपरा पिंजून काढून अथक परिश्रम घेऊन शोध घेतला असता जवळपास 1000 खताच्या पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली ताडपत्रीने झाकून सदर कार लपवून ठेवलेल्या स्थितीत मिळून आली. सदर कार बाबत वर्गीस यांना विचारपूस केली असता त्याने व पॅट्रिक सिंग याने कार चोरीचा विमा मिळवण्यासाठी सर्व कट रचला असून त्यांनीच सदर कार संगनमताने येथे लपवली अशी माहिती दिली. सावंगी पोलिस स्टाफसह पॅट्रिक यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपिंना पो.स्टे. सावंगी यांचे ताब्यात देण्यात आले. 

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर,अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत साळूंखे, उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा पियुष जगताप, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे, महेश इटकल, पोलिस अंमलदार स्वप्निल भारद्वाज, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, विकास अवचट, संघसेन कांबळे अभिजित वाघमारे, राकेश अष्टनकर, विजय पंचटिके, दीपक गेडे, विष्णू काळुसे यांनी केली.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha crime news lcb and sawangi police car policy owner
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे