वर्धा येथे पत्रकारावर प्राणघातक हल्ला...

वर्धा येथून सेलूला जात असताना कोटंबकर यांची मोटार अडवून अज्ञातांनी हल्ला केला.

वर्धा : वर्धा येथील दत्तपूर टी पॉईंटवर एका पत्रकारावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्यात रवीद्र कोटंबकर हे गंभीर जखमी झाले आहेत. कोटंबकर हे वर्ध्याच्या एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. वर्ध्यावरून सेलूला जात असताना अज्ञातांनी त्यांची मोटार अडवून त्यांना मारहाण केली आहे.

बहुचर्चित भद्रावती येथील युवतीच्या हत्याकांडाची अंशत: उकल...

वर्धा येथून सेलूला जात असताना कोटंबकर यांची मोटार अडवून अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी मोटारचालकासह वृत्तपत्राच्या संपादकांनाही मारहाण करण्यात आली. तर गाडीचीही तोडफोड केली गेली. हल्ल्यामागील कारण समजू शकलेले नाही. 10 ते 12 हल्लेखोर असल्याची माहिती पुढे आली आहे. कोटंबकर यांच्या डोक्याला आणि पायावर दुखापत झाली असून, त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

चंद्रपूर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूकप्रकरणी झारखंडमधून केली अटक

दरम्यान, याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून कलम 307, 143, 148 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक सध्या आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

चंद्रपूरमधील महाराष्ट्र बँकेच्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: wardha crime news journalist ravindra kotambkar attack datta
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे