हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक १ची उल्लेखनीय कामगिरी...

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक १ने उल्लेखनीय कामगिरी करत जबरी चोरी करणाऱया आरोपींना जेरबंद केले.

हिंगणघाट (वर्धा): हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक १ने उल्लेखनीय कामगिरी करत जबरी चोरी करणाऱया आरोपींना जेरबंद केले असून, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

वर्धा जिल्हा पोलिस दलात चाललंय तरी काय?

सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी (ता. २१) सकाळी 06.00 वा. चे दरम्यान फिर्यादी श्रीमती अंगुरीबाई गुलाबसिंग चितोडीया (वय 63) या शौचावरुन घरी पायदळ येत असतांना तीन जण त्यांच्या जवळ गेले. फिर्यादीचे कानातील दोन नग सोन्याचे बाली व एक नग नाकातील नथनी असे 13 ग्रॅमचा एकूण 50,000 रूपयांचा माल जबरीने हिसकावून घेतला. याबाबतची तक्रार दाखल झाली होती. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे पोलिस हवालदार शेखर डोंगरे यांना आवश्यक त्या सूचना देऊन शोधकामी रवाना केले होते. सदर गुन्हा दाखल होताच ठाणेदार यांचे आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहिती काढून अनोळखी आरोपींचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील आरोपी हे शास्त्री वार्ड, हिंगणघाट येथील रेल्वे उडाण पुलाचे खाली वावरतांना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती
घेतली असता, त्यांचे अंगझडतीतून चोरलेले दागिने सापडले. 1) प्रज्वल सुनिल कडू (वय 18 वर्ष, रा. तेलंगखेडी, तहसील कार्यालयाचे मागे, हिंगणघाट), 2) अभिषेक भैय्याजी वरभे (वय 19 वर्ष, रा. चिमटेबाबा ग्राऊन्ड, कोचर वार्ड, हिंगणघाट), 3) आकाश धनजी गोडकिया (वय 19 वर्ष, रा. चिमटेबाबा
ग्राऊन्ड, कोचर वार्ड, हिंगणघाट) अशी तिघांची नावे आहेत. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, मुद्देमालासह त्यांना अटक करण्यात आली आहे.

जबरी चोरी आणि लुटमारीचा गुन्हा उघड करण्यात समुद्रपुर पोलिसांना यश

सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपिभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम, हिंगणघाट यांचे आदेशाने वरीष्ठ पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके, गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे प्रमुख पोलिस हवालदार शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, पोशि. भारत बुटलेकर यांनी केली आहे.

घुग्गुस येथील IPL जुगार अड्डयावर छापा; मोठे मासे लागणार गळाला...

देशात हाहाकार माजविणाऱ्या 'इराणी' गॅंगचा पर्दाफाश...

बहुचर्चित भद्रावती येथील युवतीच्या हत्याकांडाची अंशत: उकल...

आता डायल करा ११२! १०व्या मिनिटाला मिळणार वर्धा पोलिसांची मदत!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक क

Title: wardha crime news hinganghat police three arrested for gold
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे