प्रेमप्रकरणातून युवती पळाली; पण शेवट कसा झाला पाहा...

प्रियकराचा मामा याने दोघांचे लग्न लाऊन देण्याचे कबूल केले. तिला त्यांच्या हवाली करण्यात आले व दोघांचे लग्न लावून देण्यात येणार आहे.

वर्धा: प्रेमप्रकरणातून घरातून पळून जाणाऱया मुलीला गिरड पोलिसांनी २ दिवसात कुठलाही पुरावा नसताना शोधून काढले. दोघांचे लग्न लावून देण्यात येणार असून, या प्रकरणाचा शेवट गोड झाला.

धक्कादायक! पुणे शहरात प्रेयसीचा सपासप वार करून खून...

गिरड पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या खापरी गावातील दादाराव नारांजे हे पोलिस ठाण्यात आला आणि मुलगी दिशा नरांजे (वय १८) अचानक राहते घरातून निघून गेल्याची तक्रार दिली. पोलिसांनी हरविलेबाबत तक्रार नोंदवून घेतली. मुलीचा मोबाईल नंबर घेऊन त्यांचा सायबर सेल कडून तांत्रिक दृष्ट्या तपास केला असता व तिचे गावात चौकशी केली. तिचे फेसबुक वरील एका मुलाशी मैत्री असल्याबाबत माहिती मिळाली. कदाचित त्याच्याच बरोबर पळून गेली असावी, असा संशय घेऊन तिचे शेवटचे मोबाईल लोकेशन चिमूर (जिल्हा चंद्रपूर) येथील दिसले. यानंतर मोबाईल बंद झाल्याचे कळताच तातडीने ठाणेदार सुनील दहीभाते यांनी पथकासह चिमुर गाठले. पण, मुलगी तेथून निघून गेल्याचे कळले. तिच्या मोबाईल वरुन ज्या नंबरवर सारखा कॉल करण्यात आला त्याचा तांत्रिक दृष्ट्या तपास केला असता सदरचा मोबाईल भद्रावती येथे असल्याचे समजले. 

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

पोलिस तत्काळ भद्रावती येथे मिळालेल्या लोकेशनवर गेले. संबंधित घर ती ज्या मुलासोबत पळून गेली त्याच्या आजीचे असल्याचे कळले. सदरची मुलगी तेथे आढळून आली. तिला महिला पोलिस कर्मचाऱयांनी पोलिस स्टेशन गिरड येथे आणले. तिला तिचे आईवडीलांचे स्वाधीन केले. परंतु, तिचे आई-वडीलांनी थोडी असमर्थता दाखवली की आता हिला घेऊन मी कुठे जाऊ? तेव्हा तिच्या प्रियकराचा मामा याने दोघांचे लग्न लाऊन देण्याचे कबूल केले. तिला त्यांच्या हवाली करण्यात आले व दोघांचे लग्न लावून देण्यात येणार आहे. प्रियकरासोबत लग्न होणार असून, या प्रकरणाचा शेवट गोड झाला.

धक्कादायक! नर्सचा ड्रेस घालून रुग्णालयात आली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha crime news girl run away with boyfriend girad police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे