ग्राहकाने असे काही केले की बंदूकधारी चोरटयांनी चक्क धूम ठोकली ..

दोन चोरटे बंदूकधारी गॅस स्टेशनमध्ये शिरले. मात्र आत शिरताच तेथे उभ्या असलेल्या यु एस मरीनने त्यातल्या एकाला खाली पाडले. अचानक झालेल्या या घटनेने घाबरून जात दुसऱ्या चोरट्याने तिथून धूम ठोकली.


युमा,एरिजोना (अमेरिका): दोन चोरटे बंदूकधारी गॅस स्टेशनमध्ये शिरले. मात्र आत शिरताच तेथे उभ्या असलेल्या यु एस मरीनने त्यातल्या एकाला खाली पाडले. अचानक झालेल्या या घटनेने घाबरून जात दुसऱ्या चोरट्याने तिथून धूम ठोकली. 

 सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा हा विडिओ आहे. यात असे दिसतेय की, दोन चोर हातात बंदूक घेऊन एका गॅस स्टेशनमध्ये शिरले. यावेळी  समोर एक यूएस मरीन उभा असतो, ते चोर आत येताच त्यातील एकाने कॅशिअरवर बंदूक ताणली. त्याच वेळी हा ग्राहक बाहेर जायच्या तयारीत असतो. मात्र या यूएस मरीनने अचानक कृतिप्रवण  चोराला खाली पाडले. त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतली. हे दृश्य बघून दुसरा चोरही हादरून गेला. तो तसाच उलट्या पावलाने बाहेर पळून जातो, असे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर दुसरा चोर पळून गेला. 

 अमेरिकेच्या यूमा, एरीजोनाची येथे घडलेली ही घटना आहे. अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या घटनेने  व्युव्हर्स अचंबित झाले आहेत. हा ग्राहक यु एस मरिनमध्ये काम करतो.  जेम्स  क्लिकर असे त्याचे नाव आहे . त्याच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे. अगदी काही सेकंदात घडलेल्या या घटनेत कुणालाही  काही इजा झाली नाही.  त्याने या दोन्ही चोरांना पळवून लावण्याची कामगिरी बजावली आहे. त्याचे हे धाडस अर्थातच लोकांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे. 

Title: viral robbery video in America
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे