एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या... पण, खोलीत आढळले ब्लेड अन् रक्तही....!

बाथरुममध्ये रक्त सांडलेलं होतं आणि एक ब्लेडही सापडले. तरुणीचा मृतदेह ऋषिकेश येथील एम्स हॅास्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणीच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे.

उत्तराखंड : येथील ऋषिकेशमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना तिच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे तिने नोटमध्ये लिहिले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील ऋषिकेशमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीने हॉटेलच्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मृत विद्यार्थिनी ही छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील खरसिया येथील रहिवासी होती. मृत विद्यार्थिनी उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. 

मृत तरुणीचे नाव रोली वैष्णव (वय २१) असे असून, ती ११ मार्चपासून उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील तपोवन येथील दुर्गा पॅलेस हॅाटेलमध्ये राहण्यासाठी आली होती. हॅाटेलमधील कर्मचारी मनोज रावत याने सांगितले की, तरुणीने ११ मार्चच्या संध्याकाळपासून आपल्या रुमचा दरवाजा उघडला नाही. कित्येक वेळा कर्मचारी रुमचा दरवाजा वाजवत होते, पण आतून कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

या बाबत माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत विशेष पोलिस निरिक्षक रितेश शाह यांनी सांगितलं की, पोलिस कर्मचारी हॅाटेल रुमचा दरवाजा तोडून आत गेले असता त्यांच्या समोर तरुणी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. मृत तरुणीला खाली उतरवण्यात आलं आणि त्यानंतर रुमची पाहणी केली. तेव्हा इंग्रजीमध्ये लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली. त्यात तरुणीने लिहिले होते की, "माझ्या मृत्यूशी कुणाचाही संबंध नाही, जे केलं आहे ते स्व-इच्छेनं केलं आहे."

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरुममध्ये रक्त सांडलेलं होतं आणि एक ब्लेडही सापडले. तरुणीचा मृतदेह ऋषिकेश येथील एम्स हॅास्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणीच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे.

Title: uttarakhand crime crime mbbs student found dead in hotel inc
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे