धक्कादायक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; गर्भपातानंतर...

एका गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश): बरेलीमध्ये एका गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारामुळे तिचा तिसऱ्या महिन्यातच गर्भपात झाला आहे. विसारतगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

पीडित महिलेचे नातेवाईक 3 महिन्यांच्या अर्भकाला घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. नातेवाईक अर्भकासह आल्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपी गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक देहत राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, महिलेने गावातील 3 जणांवर सामूहिक बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप केला आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हॉटेलमध्ये नवऱयाला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर चपलेने धुलाई...

'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...

धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: uttar pradesh crime news pregnant women torcher and three mo
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे