बापरे! गर्भवतीची हत्या पती आणि मावशीच्या अनैतिकसंबंधातून...

गर्भवतीची हत्ये प्रकरणी महिलेचा पती आणि मानलेल्या मावशीला अटक करण्यात आली आहे.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): गर्भवतीची हत्ये प्रकरणी महिलेचा पती आणि मानलेल्या मावशीला अटक करण्यात आली आहे. मृत महिलेचा पती आणि त्याच्या मावशीचे अनैतिक संबंध होते. याशिवाय महिलेकडे हुंड्याची मागणी केली जात होती. या दोन कारणांमुळेच गर्भवतीची हत्या झाल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

धक्कादायक! पत्नी एक महिन्याची गर्भवती होती...

गर्भवतीच्या हत्येनंतर तिच्या पती आणि त्याच्या मानलेल्या मावशीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कंत्राटदार आणि त्याच्या कामगारावर संशय व्यक्त केला. लूटमार करण्याच्या प्रयत्नात हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पण, पोलिसांनी खरी माहिती शोधून काढली. महिलेचा पती आणि त्याच्या मावशीने हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांकडून ४९ हजारांची रोकड, दागिने आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.

प्रेम विवाहानंतर हनिमूनच्या रात्री पतीला बसला मोठा धक्का...

पोलिस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी संतोष कुमार साहू आणि त्याची मानलेली मावशी शांती यांचे १२ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. लग्नानंतर संतोषची पत्नी सोनी अडसर ठरत होती. विशेष म्हणजे शांतीनेच संतोष आणि सोनी यांचा विवाह ठरवला होता. ५ मे रोजी संतोष ऑफिसला गेल्यावर शांती आणि सोनी यांच्यात वाद झाला. भांडण टोकाला गेल्यावर सोनीने विष प्राशन केले. त्यानंतर सोनीच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिचं शरीर गार पडले. शांती सोनीला बाथरूममध्ये घेऊन गेली. तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला शुद्ध आली नाही. त्यानंतर केबलच्या तारेने तिचा गळा दाबला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शांतीने घरातल्या कपाटाचे कुलूप फोडले आणि रोकड, दागिने काढले. मात्र, बॅग घेऊन घरातून निघताना ती अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत दिसली. या फुटेजमुळे पोलिसांना संशय आला. शांतीने तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. सोनीचा पती संतोष मावशीच्या मदतीने सोनीला हुंड्यासाठी त्रास द्यायचा. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील अटक केली. पुढील तपास सुरू आहे.'

विवाहीत महिलेचे अनैतिक संबंधाचा पतीला आला संशय अन्...

धक्कादायक! पत्नीने अनैतिक संबंध तरीही नवरा फोटो पाहून गहिवरतो...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: uttar pradesh crime news pregnant women murder case husband
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे