कोंबड्याच्या अपहरणामुळे पोलिसच आले अडचणीत...

कोंबडा गायब झाला आणि चार दिवसांनी तो मृतावस्थेत आढळला. कोंबड्याच्या मृत्यूची चर्चा रंगल्यामुळे तपास सुरू झाला.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका टॅटू पार्लरमधून कोंबडा गायब झाला आणि चार दिवसांनी तो मृतावस्थेत आढळला. कोंबड्याच्या मृत्यूची चर्चा रंगल्यामुळे तपास सुरू झाला. कोंबड्याचे अपहरण झाल्याची घटना एका सीसीटीव्हीत दिसली आणि तेथून या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले असून, पोलिसही अडचणीत सापडले आहेत.

Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका

ओशियन स्प्रिंग्समधल्या टॅटू पार्लरमध्ये शुभंकर म्हणून ठेवलेला कार्ल ज्युनिअर नावाचा कोंबडा अचानक गायब झाला. त्यामुळे मालकाने त्याच्या शोधासाठी जोरदार मोहीम सुरू केली. यासाठी त्याने फेसबुकवरही एक पोस्ट लिहिली. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे कोंबड्याचे अपहरण झाल्याचे पुढे आले. कोंबडा 26 एप्रिलपासून गायब झाला होता. पार्लरचा मालक जॅक्सन याने या संदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहील्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आणि तपास सुरू झाला.

पाकमध्ये महिला पोलिस उपनिरिक्षकाने अखेरची इच्छा लिहीली आरशावर...

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला आणि काही पुरुष पोर्चमधून या कोंबड्याला चोरून नेताना दिसून आले. दुसऱ्या व्हिडिओत मिसिसिपीजवळच्या बिलोक्सीमध्ये कोंबड्याचा मृतदेह आढळून आला. `न्यूज वीक`च्या वृत्तानुसार, जोन्स काउंटीच्या महापालिका विभागाने याला दुजोरा दिला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या महिलेला प्राण्यांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. फुटेजमध्ये दिसणारी महिला ही बाल केंद्रातली सुधार अधिकारी कॅंड्रा शेफर असल्याचा संशय असून तिलाही अटक करण्यात आली आहे. तिची सेवा बडतर्फ करण्यात आली असून, तिला 4 मे रोजी महापालिका न्यायालयात हजर करण्यात आले. एकूणच या कोंबड्याच्या हत्या प्रकरणामुळे पोलिसांनाही तपास करावा लागत असून, जगभर कोंबड्याचा विषय रंगला आहे.

Video : विमानाचे उतरताना झाले चक्क दोन तुकडे; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: usa crime news one hen kidnap and found dead police register
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे