धक्कादायक! ...अन् अचानक नवरा घरी आला

प्रियकराने महिलेच्या पतीवर गोळ्या झाडल्याची घटना अलबामा येथे घडली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

न्यूयॉर्क : प्रियकर लपून प्रेयसीच्या घरा राहात होता. पण, एक दिवस अचानक महिलेचा नवरा घरी आल्यानंतर गोंधळ उडाला. यावेळी प्रियकराने महिलेच्या पतीवर गोळ्या झाडल्याची घटना अलबामा येथे घडली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: पाकिस्तानमध्ये रिक्षात पळत चढून घेतला महिलेचा 'किस'

फ्रँक रीव्स (वय 58) आपली पत्नी ट्रेसीसोबत राहत होता. 15 ऑगस्ट रोजी तो अचानक घरी आला आणि पाहिले की, पत्नीसोबत एक अनोळखी व्यक्ती आहे. पण, काही कळायच्या आतच समोरील व्यक्तीने गोळी झाडायला सुरवात केली. यावेळी दोघेही एकमेकांच्या दिशेने गोळ्या झाडू लागले. गोळीबाराचा आवाज ऐकून ट्रेसी पळत बाहेर आली आणि तिने दोघांना शांत केले. माइकल अमाकर हा पत्नीचा प्रियकर असल्याचे समजले. आहे. त्यादिवशी ट्रेसीनं अमाकर याला आपल्या पती फ्रँकबद्दल सांगितले नव्हते, तिने म्हटलेले की कोणीतरी चोर घरात शिरला आहे.

धक्कादायक! कबरीतून मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार...

माइकल अमाकर याने चोर समजून फ्रँकवर गोळीबार केला होता. यानंतर फ्रँकनेही गोळी झाडली. या भांडणात फ्रँकच्या छातीवर गोळी लागली आणि अमाकरच्या पायाला गोळी लागली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्रँक आणि ट्रेसीच्या घरामध्ये अमाकर हा एका वर्षापासून लपून राहत होता. ट्रेसी त्याला जेवण, पाणी सर्व पुरवत होती. शेजाऱ्यांनी सांगितले की, फ्रँक अत्यंत शांत स्वभावाचे असून ते जास्त लोकांना भेटतही नाहीत. सुदैवाने या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले नाहीत. रुग्णालयातून सोडल्यानंतर अमाकरला अटक करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: usa crime news husband shot by wife lover who secretly livin
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे