डबल डेकर बस आणि ट्रकमध्ये अपघात; 13 जणांचा मृत्यू...

आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर गाय वाचवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकला डबल डेकर बसची धडक झाली.

लखनौ (उत्तर प्रदेश): बाराबंकीमध्ये डबल डेकर बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, जखमींची संख्याही मोठी आहे.  हा अपघात देवा पोलिस स्टेशन परिसरातील बाबुरीया गावाजवळ आऊटर रिंग रोडवर झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

मी तुमची कामवाली आहे का, तुम्ही तुमची कामे करत बसा...

पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गंभीर जखमींना लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रक आणि बसचे तुकडे झाले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आऊटर रिंगरोडच्या किसान मार्गावर गाय वाचवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकला डबल डेकर बसची धडक झाली. या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी या अपघातातील जखमींना योग्य उपचार देण्याचे आणि बाधित लोकांना शक्य ती सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले. जखमींना 50-50 हजारांची भरपाई दिली जाईल.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची मोठी कारवाई...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: up barabanki truck bus accident 13 dead and 27 injured
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे