ज्ञानमंदिरात तिला करावा लागला बलात्काराशी सामना...

संबंधित विद्यार्थिनी शाळेत असताना तिच्याच वयाचे चौघे तेथे आले अन् चारही बाजूंनी तिला घेरले. अचानक घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे मुलगी हादरली. तिने आरडा-ओरड करायच्या आतच चारही मुलांनी तिच्या शरीराचे लचके तोडले.

ज्ञानमंदिरात तिला करावा लागला बलात्काराशी सामना...

लंडन : शाळा म्हणजे विद्यार्थी व पालक या दोघांच्याही दृष्टीने सुरक्षित ठिकाण मानलं जातं. ज्ञानार्जनासाठी विद्यार्थी शाळेत येतात. मात्र, लंडनमधील एका शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला ज्ञानमंदिरात बलात्काराशी सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. 

संबंधित विद्यार्थिनी शाळेत असताना तिच्याच वयाचे चौघे तेथे आले अन् चारही बाजूंनी तिला घेरले. अचानक घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे मुलगी हादरली. तिने आरडा-ओरड करायच्या आतच चारही मुलांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. या प्रकरणी चारही मुलांना अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, हे चारही आरोपी १४ ते १६ वयोगटातील असून, अफगानशी संबंधित आहेत. ते नावेतून लंडनला पोहोचले. संबंधित मुलीवर एक मुलगा अत्याचार करत असताना, इतर तिघे शेजारी सुरक्षारक्षकाची भूमिका बजावत होते. केंट पोलिसांच्या प्रवक्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व आरोपींना जामीनावर सोडण्यात आले असून, त्यांच्याकडून जबाब नोंदविला जात आहे. सध्या शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. त्यानंतर घटनेचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. 

दरम्यान, संबंधित विद्यार्थिनी घडलेल्या प्रकारामुळे घाबरली असून, तिचे समुपदेशन करण्यात येत आहे. 

Title: UK news student rape case four accused arrested police acti
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे