...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

टोलनाक्यावर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ थांबावे लागल्यास टोलमाफ

टोल प्लाझावर टोल भरणे हे अनेकदा वाहन चालकांसाठी जिकीरीचे ठरते. वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यामुळे लागणारा वेळ, टोल कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी कारणांनी टोल प्लाझा अनेकदा चर्चेत असतात.

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलबाबत नुकत्याच नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या अंतर्गत टोल ऑपरेटरला प्रत्येक वाहनासाठीचा सेवा कालावधी 10 सेकंदापेक्षा जास्त नसावा, याची काळजी घ्यावी लागणार आहे. टोल नाक्यावर एखाद्या फोर व्हिलरला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागल्यास त्यास कर भरण्यापासून सूट मिळणार आहे. वाहन चालकांना टोल प्लाझावर पुरेसा जागा उपलब्ध व्हावी यासाठी पिक अवर्स दरम्यान देखील हा नियम लागू असेल.

धक्कादायक! नेत्याचे अनेक मंत्र्यांसोबत फोटो; पराक्रम पाहा...

टोल प्लाझावर टोल भरणे हे अनेकदा वाहन चालकांसाठी जिकीरीचे ठरते. वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यामुळे लागणारा वेळ, टोल कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी कारणांनी टोल प्लाझा अनेकदा चर्चेत असतात. त्यावर फास्टॅग ही प्रणाली लागू करण्यात आलेली असली तरी रोखीने टोल भरणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाणही अजून लक्षणीय आहे.

Video: सुशील कुमार मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल प्लाझामध्ये वाहनांनी प्रवेश करण्यापूर्वी 100 मीटर अंतर अलिकडे टोल प्लाझा यंत्रणेने यलो लाईन आखावी, असे सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत यलो लाईन म्हणजेच पिवळी रेषेच्या मागे वाहने दिसली तर टोल ऑपरेटरला कर न घेता गाड्या पुढे सोडाव्या लागतील. राष्ट्रीय महामार्गांवर गर्दीच्या काळातही टोल प्लाझावर टोल भरताना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून हा नवीन नियम लागू करण्यात आल्याचे एनएचएआयने सांगितल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

बापरे! पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल 32 कोटी रुपयांची फसवणूक

एनएचएआयच्या म्हणण्यानुसार फास्टॅग प्रणालीमुळे टोल प्लाझावरील वाहनांची टोल भरण्यासाठीची प्रतिक्षा करण्याचा वेळ कमी झाला आहे. नवीन नियमानुसार, 100 मीटरपेक्षा अधिक अंतरावर प्रमाणापेक्षा अधिक वाहनांची रांग लागल्यास वाहनांना टोल न भरता पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पण, हा नवीन नियम फक्त रोख रक्कम देत टोल भरणाऱ्यांसाठी असेल. जे वाहन चालक टोल भरण्यासाठी फास्टॅग प्रणालीचा वापर करतात, त्यांचे वाहन टोल खिडकी जवळ येताच टोलची रक्कम आपोआपच वजा होते. त्यामुळे फास्टॅग प्रणाली वापरणाऱ्या वाहन चालकास 10 सेकंदांपेक्षा जास्त काळ टोल प्लाझावर थांबावे लागले तर त्यास टोल मधून सूट मिळणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. तसेच प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅग प्रणालीव्दारे टोल भरणाऱ्या वाहन चालकांसाठी स्वतंत्र लेन असते. त्यामुळे हे कामकाज जे वाहनचालक रोख टोल भरतात त्यांच्या तुलनेत वेगवान आणि सहजपणे चालते.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: toll plaza news if you wait more than 10 seconds at toll pla
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे