बापरे! कारागृहात कारवाईच्या भीतीने कैद्याने गिळला मोबाईल...

तिहार तुरुंगातील एका कैद्याने कारवाईच्या भीतीने आपला मोबाईल गिळल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली: तिहार तुरुंगातील एका कैद्याने कारवाईच्या भीतीने आपला मोबाईल गिळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (5 जानेवारी) घडली आहे. कैद्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bulli Bai App च्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तुरुंग अधिकारी संदीप गोयल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, तिहार एक क्रमांक तुरुंगातील एका कैद्याने मोबाईल गिळला आहे. शोधासाठी आमचे कर्मचारी त्याच्याकडे पोहोचले असता त्याने मोबाइल गिळला. उपचारासाठी या कैद्याला डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. मात्र, मोबाईल अजूनही पोटातच आहे. डॉक्टर शस्त्रक्रीया करून मोबाईल बाहेर काढणार आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: Tihar Jail Inmate Swallows Mobile Phone Fearing Search
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे