चोरीचा गुन्हाचा १२ तासाच्या आत शोध

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतल चोरीचा गुन्हाचा उकल 12 तासाच्या आत करून 1 लाख 93 हजार रू. किमतीचा मुददेमाल हस्तगत.

सोलापूर: तालुका पोलीस स्टेशन हददीतुन तक्रारदार महिला हया रिक्षा मथुन कोंडी ते एम. आय. डी. सी पाकणी असा प्रवास करत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या पर्स मधुन १,६०,०००/- रू चे दागीने तसेच ४२,५००/- रोख रक्कम यातील अनोळखी चोरट्या महिलेने चोरून नेले म्हणुन वगैरे दिले फिर्यादी वरुन सोलापूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. ४११ / २०२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांमुळे अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत...

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री. प्रभारकर शिंदे, एस.डी.पी.ओ. सोलापूर विभाग सोलापूर व पो. नि. फुगे यांनी आनोळखी महिला आरोपीचा शोध घेण्याकरीता सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. आरोपींचे गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून संशयित आरोपी मिळुन हि मुळेगाव शिवारामध्ये आल्याने तीच्याकडुन गुन्हयात चोरलेला मुददेमापैकी सर्व दागीने (१,६०,०००/- रू) तसेच ३३,०००/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास सपोफौ बाळु राठोड हे करत आहेत.

धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर श्री. प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरुण फुगे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सपोनि नेताजी बंडगर, मसपोनि माधुरी तावरे, सपोफौ बाळु राठोड, सपोफौ सांजेकर सांपोहेकॉ/ शशि शिंदे, पोहेकॉ/ फयाज बागवान, पोहेको सुनिल बनसोडे, पोना. श्रीराम आदलींग, मपोहेको वैशाली कुंभार, मपोना / सरस्वती लोकरे, मपोना / सुनित चवरे, पोकॉ. असिफ शेख, पोकॉ देवा सोलंकर, पो. कॉ. किशोर सलगर, पो. कॉ अशोक खवतोडे, पो.कॉ. राजु इंगेळ, यांनी केली आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Theft crime detected within 12 hours
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे