महिलेने पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवल्यावर बसला धक्का...

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजाऱ्याने घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

लखनऊ (उत्तर प्रदेश): घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजाऱ्याने घरात घुसून एका महिलेवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर (नोएडा) च्या फेज-२ भंगेल परिसरात एक महिला घरामध्ये झोपली होती. तर तिचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरात येईल म्हणून महिलेने घराचा दरवाचा उघडा ठेवला होता. मात्र हा दरवाजा उघडा ठेवणे महिलेसाठी धक्कादायक ठरले.

SVS Aqua कंपनीत मृत्यू झालेल्या 17 जणांची नावे आली समोर...

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने छतावरून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने या महिलेच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

प्युरीफायरचे केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी महिलेने तिच्या घराशेजारी राहत असलेल्या रिंकू नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहत असलेल्या रिंकूने या संधीचा गैरफायदा घेतला. त्याने गुपचूप महिलेच्या खोलीत घुसून तिला मारहाण केली.

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

तसेच घाबरवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पीडित महिलेला जिल्हा रुग्णालयात नेऊन तिच्यावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: The woman left the door of the house open for her husband a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे