जन्मदात्या आईनेच केल हे कृत्य सहा तासात उघड

मंगळवेढा शहर परिसरातील अकोला रोडवर आईनेच चक्क शेत जमिनीचा हिस्सा मागितल्याच्या कारणावरून 35 वर्षीय मूलीचा खून केल्याचा प्रकार उघड.

सोलापूर: मंगळवेढा शहर परिसरातील अकोला रोडवर आईनेच चक्क शेत जमिनीचा हिस्सा मागितल्याच्या कारणावरून 35 वर्षीय मूलीचा खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे.दरम्यान अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळाला भेट देवून खूनाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने फिर्यादीच या खून प्रकरणात आरोपी असल्याने पोलिसांनी चंदाबाई कुबेर नरळे (वय 55) हिला खून प्रकरणी अटक केली आहे.या घटनेची हकिकत अशी, यातील आरोपी चंदाबाई नरळे हिने दि. 9 रोजी रात्री 11.00 वाजता आम्ही मायलेकी घराच्या गच्चीवर झोपलो होतो.पोटात कळ आल्याने शौचास गेल्यानंतर माझी मुलगी मंगल कुबेर नरळे (वय 35) हिचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी घराच्या गच्चीवर डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांमुळे अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत...

पहाटे 4.00 वाजता अज्ञात इसमाविरूध्द मंगळवेढा पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारेकरी अज्ञात असल्याने खुनाचा गुन्हा उघड करणे पोलिसांना एक आव्हान होते.या घटनेची माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांना समजताच सकाळी त्यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेमागची कारणमिमांसा जाणून घेतली. पोलिसांनी फिर्यादी तथा आरोपी चंदाबाई नरळे हिला विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता मयत ही जमिनीचा हिस्सा मागत असल्याने तीचा खून केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

पोलिसांनी तीला घटनास्थळी नेवून सदर ठिकाणचा पंचनामा केला. व डोक्यात घातलेला दगड जप्त करून तीला अटक करण्यात आली. आरोपीच्या पतीचे मागील सहा महिन्यापुर्वी निधन झाले आहे. मयत मुलगी मंगल ही मागील दहा महिन्यापासून आईकडेच रहात असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

मेव्हणीच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यावर दाजीने उचलले मोठे पाऊल...

तपास कामी डी. वाय. एस. पी. राजश्री पाटील यांनी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे, तपासिक अंमलदार भगवान बुरसे यांना योग्य रितीने मार्गदर्शन केल्याने केवळ सहा तासात खूनाचा उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आरोपीला आज न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: The act was committed by the birth mother in six hours
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे