धक्कादायक! पाळीव श्वानाला कुत्रा म्हटले आला राग अन्...
शेजाऱ्यांनी घरात पाळलेल्या कुत्र्यावर नाराज होते. त्याने अनेकदा शेजाऱ्यांकडे त्या कुत्र्याची तक्रारही केली होती.चेन्नई (तमिळनाडू): घरा शेजाऱ्याच्या पाळीव श्वानाला कुत्रा म्हटले म्हणून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिंडीगुल जिल्ह्यातील थाडीकोंबू शहरात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
रायाप्प्पन हे शेजाऱ्यांनी घरात पाळलेल्या कुत्र्यावर नाराज होते. त्याने अनेकदा शेजाऱ्यांकडे त्या कुत्र्याची तक्रारही केली होती. शेजारी रहाणारे डॅनियल आणि विनसेंट हे रायाप्पनचे नातेवाईक होते. घराजवळून जाणाऱ्या वाटसरुंवर कुत्रा भुंकायचा. त्यांच्या अंगावर धावून जायचा. त्यावरुन रायाप्पनच्या मनात राग होता. रायाप्प्नने त्या कुत्र्यांना त्यांच्या नावावरुन बोलवले नाही. पाळीव कुत्र्याला कुत्रा म्हटले म्हणून भांडणाला सुरुवात झाली. या कुत्र्याला मालकाने बांधून ठेवावे, असे त्याच म्हणणे होते.
दोघांमध्ये भांडण सुरु असताना रायाप्पन त्या कुत्र्याला मारण्यासाठी काठी घेऊन आला. संतापलेल्या विनसेंट आणि डॅनियलने हल्ला चढवला. रायाप्पन खाली पडला, तो बेशुद्ध झाला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. थाडीकोंबू पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आरोपींच्या शोधासाठी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बापरे! महिलेच्या अंगावर जाणीवपुर्वक सोडला कुत्रा; गुन्हा दाखल...
Video: फोटोमधील कुत्रा दिसत असला तरी तो कुत्रा नाही; काय आहे पाहा...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.