क्रूरता! तालिबान्यांनी गर्भवती महिला पोलिसाला कुटुंबासमोर घातली गोळी...

अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप आहे. जे खातेरा यांच्यासोबत घडले ते तिथल्या अनेक महिलांसोबत घडत आहे.

काबूल (अफगाणिस्तान): तालिबान्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून, घोर प्रांतात गर्भवती महिला पोलिसाला तिच्या कुटुंबासमोर गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला पोलिस कर्मचाऱ्याचं नाव बानो नेगर असे आहे. 

होय! हाच तो आत्मघातकी दहशतवादी...

बानो नेगरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 'बानोवर हल्ला झाला तेव्हा ती 6 महिन्यांची गर्भवती होती. गोळी घातल्यानंतर तिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या कार्पेटवर पडलेला होता. तिचे रक्ताने भिजलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. स्थानिक तालिबानने या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आहेत.' तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, 'तालिबानने निगारा यांची हत्या केलेली नाही. मात्र, आमची चौकशी सुरू आहे.'

तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देत आहे, याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये पोलीस खात्यात सेवा बजावलेल्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. खातेरा हाशिमा असं य़ा महिलेचं नाव आहे. "तालिबान अजिबात बदलला नाही, अगदी 20 वर्षांपूर्वी होता तसाच आहे. मी गर्भवती असताना देखील तालिबान्यांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर अत्याचार करत माझ्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझे डोळे बाहेर काढले.'

आफगाणिस्तानमधील पत्रकाराला मारल्याबाबत नवीन खुलासा...

अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप आहे. जे खातेरा यांच्यासोबत घडले ते तिथल्या अनेक महिलांसोबत घडत आहे. त्या महिला बाहेर येऊ शकत नाहीत, कोणाला काही सांगू शकत नाहीत, असेही देखील खातेरा यांनी सांगितले. खातेरा सध्या भारतात आहेत पण अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अत्याचाराबाबत सांगतांना त्यांचा अंगावर काटा उभा राहिला. इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाणी लोकांना धमकावत आहे. यापूर्वी, हेरात प्रांतातील डझनभर महिलांनी सरकारमध्ये हक्क आणि महिलांच्या प्रतिनिधीत्वाच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. शनिवारी तालिबानने काबूलमध्ये महिलांच्या निदर्शनांवरही हल्ला केला. तालिबानच्या सत्तेतील मागील कार्यकाळ संपल्यानंतर लोकशाही राजवटीत निर्माण झालेल्या महिलांच्या नागरी हक्कांना सुरु ठेवण्याची मागणी आंदोलक करत होते.

क्रूरता! काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार, रस्त्यावर रक्ताचा सडा...

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अफगाण महिलांनी आपले मस्तक आणि चेहरा झाकण्यास सुरुवात केली कारण त्यांना तालिबानी अतिरेक्यांनी हिजाब किंवा बुरख्याशिवाय पाहिले तेव्हा त्यांना मारहाण झाली. गेल्या आठवड्यात तालिबानने खासगी विद्यापीठांना एक फर्मान जारी केले, ज्यामध्ये त्यांना पुरुष आणि महिला विद्यार्थ्यांना एकत्र शिकवू नये असे आदेश देण्यात आले.

भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

तालिबानने अपहरण केलेले भारतीय सुखरूप...​

अफगाणिस्तान मधील हा फोटो नाहीच; जाणून घ्या सत्य...

Live Video: काबूल विमानतळावर गोळीबारानंतर मोठा गोंधळ...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: taliban Shoot Afganisthan Policewomen Front of her family
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे