तालिबान सरकारचे मत्रिमंडळ जाहीर; कसे आहे पाहा...

मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानमध्ये नव्या तालिबान सरकारची घोषणा करण्यात आली असून, तालिबानने आपल्या मंत्रिमंडळ देखील जाहीर केला आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. 

क्रूरता! तालिबान्यांनी गर्भवती महिला पोलिसाला कुटुंबासमोर घातली गोळी...

अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तालिबानचा नंबर दोन नेते म्हणून मुल्ला गनी बरादर उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील. बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा सरकारचे पंतप्रधान असतील आणि मुल्ला अब्दुल गनी बरदार सरकारचे उप पंतप्रधान असतील. मुल्ला याकूब संरक्षण मंत्री आणि सिराजुद्दीन हक्कानी हे गृहमंत्री असतील.

होय! हाच तो आत्मघातकी दहशतवादी...

तालिबानचं नवं मंत्रिमंडळ पुढीलप्रमाणेः

 • पंतप्रधान- मुल्ला मोहम्मद हसन अखुंद

 • उपपंतप्रधान (1)- मुल्ला गनी बरादार

 • उपपंतप्रधान (2)- मुल्ला अब्दास सलाम

 • गृहमंत्री- सिराजुद्दीन हक्कानी

 • संरक्षण मंत्री- मुल्ला याकूब

 • माहिती मंत्री- खैरुल्लाह खैरख्वा

 • माहिती मंत्रालयातील उपमंत्री- जबिउल्लाह मुजाहिद

 • उप परराष्ट्र मंत्री- शेर अब्बास स्टानिकजई

 • न्याय मंत्रालय- अब्दुल हकीम

 • अर्थमंत्री- हेदयातुल्लाह बद्री

 • मिनिस्टर ऑफ इकोनॉमी- कारी दीन हनीफ

 • शिक्षण मंत्री- शेख नूरुल्लाह

 • हज आणि धार्मिकसंबंधी मंत्री - नूर मोहम्मद साकीब

 • आदिवासी व्यवहार मंत्री- नूरुल्लाह नूरी

 • ग्रामीण पुनर्वसन आणि विकास मंत्री- मोहम्मद युनूस अखुंदजादा

 • सार्वजनिक बांधकाम मंत्री- अब्दुल मनन ओमारी

 • पेट्रोलियम मंत्री- मोहम्मद एस्सा अखुंद

आफगाणिस्तानमधील पत्रकाराला मारल्याबाबत नवीन खुलासा...

क्रूरता! काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार, रस्त्यावर रक्ताचा सडा...

भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

तालिबानने अपहरण केलेले भारतीय सुखरूप...​

अफगाणिस्तान मधील हा फोटो नाहीच; जाणून घ्या सत्य...

Live Video: काबूल विमानतळावर गोळीबारानंतर मोठा गोंधळ...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: taliban announce government mullah mohammad hassan akhund pm
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे