उस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवसांतच सकारात्मक बदल दिसतीलः अतुल कुलकर्णी

येत्या काही दिवसांतच चांगले, सकारात्मक बदल दिसून येतील. आपण कमी बोलू, पण काम जास्तीचे करू, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. १४) दिली.

उस्मानाबाद : कायदा सुव्यवस्थेवर जे काय प्रश्नचिन्ह आहेत ते बदलण्यासाठीच मी आलो आहे. खास करून आपण महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. येत्या काही दिवसांतच चांगले, सकारात्मक बदल दिसून येतील. आपण कमी बोलू, पण काम जास्तीचे करू, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. १४) दिली. 

उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी

पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी म्हणाले, मॉरल पोलिसिंगवर आपला भर राहणार आहे. गुन्हेगारी अत्याचार, सायबर गुन्हे हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करून लोकांना समवेत घेऊन काम करण्यात येईल. उस्मानाबाद शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लवकरच फोडून सुरळीत करू. सिग्नल यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शहरातील प्रलंबित सीसीटीव्ही बसविण्याच्या दृष्टीने होता होईल तितक्या लवकरात लवकर पाठपुरावा करून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मावस बहिणीसोबतच्या प्रेमप्रकरणातून युवकाचा खून...

'ऑनलाइन फसवणुकीच्या घटना करण्यासाठी कमी व्यापक जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. महिला सुरक्षेसाठी शाळा महाविद्यालय स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरात घडणाऱ्या छेडछाडीच्या घटना, होणारे वाद त्यातून रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबद्दल मला माहिती मिळाली आहे. संघटित गुन्हेगारांवर कारवाया प्रस्तावित आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भातील निर्णय घेत आहोत. महिला मुलींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांची स्वतंत्र टीम कार्यरत करण्यात येईल. चोरी, दरोडे, अत्याचार, रस्त्यावर वाढदिवस करून टवाळखोरी करणारे यांचा बंदोबस्त करू. गुन्हेगारांवर कायद्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करू, सायबर गुन्हे रोखणे, महिला सुरक्षा जनजागृती या सह ग्राहक तक्रार दिनाचे आयोजन करत नागरिकांशी संवाद ठेवत कायदा-सुव्यवस्था यांना प्राधान्य देणार आहे,' असेही श्री. कुलकर्णी त्यांनी सांगितले. 

धक्कादायक! कॉपी करताना पकडले म्हणून विद्यार्थाची आत्महत्या

श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, 'पोलिस आणि जनतेतील संबंध सुधारण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये तक्रार निवारण दिन महिन्यातील दोन शनिवारी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांशी आपण स्वतः पोलिस अधीक्षक या नात्याने किंवा अति.पोलिस अधीक्षक संवाद साधणार आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. महिला सुरक्षेवर विविध उपक्रम केले जाणार असून, यामध्ये महिला मुलींसाठी तक्रार पेटी तसेच महिला छेडछाडीविरोधात कृती कार्यक्रमाचा सुद्धा समावेश असणार आहे.'

लग्न होताच काढला त्याने विवाहित मैत्रिणीचा काटा; मग पुढे...

दोन गटातील हाणामारीप्रकरणी सहायक निरीक्षकासह चार पोलिस निलंबित

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: superintendent of police osmanabad ips atul kulkarni says so
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे