आजचा वाढदिवसः आयपीएस नुरूल हसन
एकेकाळी त्यांच्या वडिलांना फी भरण्यासाठी जमीन विकावी लागली. आपल्या समर्पण आणि परिश्रमांच्या जोरावर आज ते आयपीएस अधिकारी बनले आहेत.आयपीएस अधिकारी नुरूल हसन यांचा उत्तर प्रदेशातील हरायपूर या गावात जन्म झाला आहे. अतिशय कष्टातून त्यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्यापासून अनेक युवक प्रेरणा घेत आहेत. एकेकाळी त्यांच्या वडिलांना फी भरण्यासाठी जमीन विकावी लागली. आपल्या समर्पण आणि परिश्रमांच्या जोरावर आज ते आयपीएस अधिकारी बनले आहेत.
नुरूल यांचे वडिल एक छोटीसी नोकरी करत होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. दोन वेळचे जेवण मिळणे सुद्धा कठीण होते. पण, कठीण परिस्थितीतही त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नूरूल यांना बारावी झाल्यानंतर बीटेक करण्याची इच्छा होती. पण, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडिलांनी जमीन विकली. बीटेक झाल्यानंतर त्यांनी आयपीएस परिक्षेचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये ते आयपीएस परिक्षा उत्तीर्ण झाले.
इंग्रजी सुधारण्याचे काम केले...
नूरुल सांगतात की, ज्या शाळेतून त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेची अवस्था अत्यंत वाईट होती. पावसात शाळेच्या छतावरून पाणी टिपत होते. तरीही अभ्यास करायचो. अशा परिस्थितीतही त्यांनी शिकवलेल्या शाळेतील शिक्षकांचे त्यांनी आभार मानले. 5 व्या वर्गात तो एबीसीडी शिकलो. बारावी पर्यंत इंग्रजी खूप कमकुवत होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजीवर काम केले.
कॉलेजने आयुष्य बदलले...
नूरूलने बारावी पूर्ण झाल्यानंतर बीटेक प्रवेश परीक्षेसाठी कोचिंग घेण्याचे ठरविले. अशा परिस्थितीत त्याच्या वडिलांनीही पाठिंबा दर्शविला आणि कोचिंगसाठी गावची जमीन विकली. मात्र, कोचिंगनंतर आयआयटीमध्ये त्याची निवड होऊ शकली नाही. परंतु, त्यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाची (एएमयू) परीक्षा उत्तीर्ण केली. येथून त्यांनी बी.टेक केले. येथूनच यूपीएससीबद्दल कल्पना मिळाली.
बी.टेक नंतर नोकरी...
बी.टेक केल्यावर नुरुलला नोकरी मिळाली. या नोकरीदरम्यान त्यांनी भाभा येथे एक मुलाखतही दिली, तेथे त्यांची निवड झाली. पण, मनात आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. नूरूल यांनी नोकरीबरोबरच यूपीएससीची तयारीही सुरू केली. त्यासाठी त्याने परिश्रमपूर्वक तयारी केली. या दरम्यान मुलाखतीच्या फेरी गाठल्या. परंतु निवड होऊ शकली नाही. तथापि, त्याने धैर्य गमावले नाही आणि यश संपादन केले.
विद्यार्थ्यांना नुरूल यांचा सल्ला...
प्रत्येकाने कठोर व परिश्रमपूर्वक तयारी केली पाहिजे. आपण कोणत्या माध्यामातून शिक्षण घेतले हे काही फरक पडत नाही. कष्टाच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. नुरूल सध्या नागपूर येथे कार्यतरत आहेत.