जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईत एका तासात 5 दहशतवादी ठार...

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केल्यानंतर जवानांनी गोळीबार सुरू केला. या कारवाईत दहशतवादी ठार झाले आहेत.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एका तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी तासाभरात सुरक्षा दलांनी दोन चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार केले.

काश्मीरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; एकाचा खात्मा...

काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले, पोमबई आणि गोपालपुरा गावात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना ठार केलं आहे. सध्या दोन्ही ठिकाणी चकमक सुरू असून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'पोलिस आणि सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते. सुरक्षा दलाने त्यांना अटक केल्यामुळे मोठा धोका टळला आहे. अमीर बशीर आणि मुख्तार भट अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. चौकात तपासणी दरम्यान त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून IED जप्त करण्यात आले आहेत. सध्या दोघांची चौकशी सुरू आहे.'

दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील पोम्बे भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहिम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केल्यानंतर जवानांनी गोळीबार सुरू केला. या कारवाईत दहशतवादी ठार झाले आहेत. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या...

काश्मीरमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा...

अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: south kashmir kulgam district 5 terrorists killed in twin en
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे