आजचा वाढदिवस! खाकी वर्दीतील तेजस्वी विचारांची रणरागिणी श्रीमती तेजस्वी सातपुते...

पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण

तेजस्वी सातपुते यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आई सौ. कृष्णाबाई सातपुते व वडील श्री. बाळासाहेब सातपुते या दाम्पत्याच्या पोटी सदन कुटुंबातील घरात झाला.

नेतृत्व हे व्यक्तीच्या आत दडलेले सर्व गुण समोर आणण्याचा प्रयत्न करते. जीवनात यश मिळवण्यासाठी नेतृत्व ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर्व यशस्वी लोकांच्या यशामागे नेतृत्वगुण हेच कारण असते. नेतृत्व हे कोणाकडून उसने किंवा विकत घेता येत नाही तर ते अंगी असावे लागते,असेच एक खाकी वर्दीतील रुबाबदार नेतृत्व म्हणजे तेजस्वी सातपुते .... 

तेजस्वी सातपुते यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आई सौ. कृष्णाबाई सातपुते व वडील श्री. बाळासाहेब सातपुते या दाम्पत्याच्या पोटी सदन कुटुंबातील घरात झाला. आई शिक्षिका तर वडील हे व्यावसायिक होते आई शिक्षिका असल्याने तेजस्वी सातपुते यांच्यावर लहानपणापासून कडक शिस्तीचे संस्कार घडले.... तेजस्वी सातपुते या लहानपणापासून हट्टी व खोडकर होत्या एखादी गोष्ट हवी असल्यास ति पुर्ण झाली तरच शांत परंतु जसे शिक्षण चालू होत गेले तशी त्यांना शिक्षणाची आवड होती गेली लहानपणापासून आपली आई आपल्याला शिक्षणासाठी ओरडत असेल तर आपण काय तरी केले पाहिजे आणि याच युक्तिला अनुसरून सातपुते यांनी आपली वाटचाल सुरू करायला सुरुवात केली तुमच्याकडे शिकण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही विचलीत करु शकत नाही हे तेजस्वी सातपुते यांनी जाणले होते .. म्हणून अनेक वेळेला आपण तेजस्वी सातपुते यांच्या शब्दात माझ्या यशात आईचे परीश्रम व मेहनत जास्त आहे हे नेहमी ऐकले आहे.कारण आईचा आशीर्वाद मिळाल्यावर हरलेला माणूस पुन्हा जिंकतो. हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे.श्रीमती तेजस्वी सातपुते या 2012 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस दलातील विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांची आतापर्यतची कामगिरी पाहिली तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तव्य कठोरपणे राबवत असतानाच, पोलिस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यातून समाजामध्ये पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याबरोबरच, पोलिस कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य उंचावण्यासाठीही खूप चांगल्या पद्धतीने मदत झाल्याचे दिसून येते.

लेडी सिंघम! सोलापूर ग्रामीणच्या महिला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते...

!! शिक्षणाचा प्रवास!!
प्राथमिक शिक्षण पूर्ण करून झाल्यावर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुढे दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला जीवनात काही तरी नवीन करायचे आहे हे तेजस्वी यांच्या मनात रूजले होते ..नवीन आणि आव्हानात्मक काहीतरी करायचं असं त्यांनी मनाशी ठरवलेलं होतं.या सगळ्यात निर्णय घेतला तेजस्वी सातपुते पुढे होत्या परंतु त्यांना भक्कम साथ होती आई वडीलांची वडील लहानपणापासून तेजस्वी यांना सांगायचे तुला हवं आहे ते तु कर फक्त तुझ्या मनाविरुद्ध जाऊन काय करू नकोस. हा लाखमोलाचा शब्द नेहमी तेजस्वी सातपुते यांच्या कानावर पडत असायचे .. त्या काळात शिक्षण सुरू असताना गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे ध्येय डॉक्टर किंवा इंजिनिअर होयचे असते परंतु इतरांच्या विचारांपेक्षा वेगळे विचार करणारे तेजस्वी सातपुते यांना वैमानिक होण्याची इच्छा होती. त्या एका मुलाखतीमध्ये सांगतात त्यांना शहीद वैमानिक निर्मलसिंग यांच्या जीवनावर एक धडा होता. त्या धड्यातुन जे काही वैमानिकाच्या आयुष्याबद्दल उमजलं होत, त्या आधारावर त्यांच हे स्वप्न निश्चित झालं होतं. मात्र जिथे आवड असेल तिथे यश येत नाही हे सर्वांच्या बाबतीत घडते आणि वैमानिक होण्याचे स्वप्न चष्मा लागल्यामुळे अपुरे राहिले होते..  पुढे शिक्षणाचा प्रवास चालू होता बारावीला  मिळालेले गुण सहजपणे मेडिकल किंवा इंजिनियरिंगला नंबर लागेल असे असतांना त्यांनी तेव्हा महाराष्ट्रात नवीनच सुरू झालेल्या बीएस्सी या अभ्यास क्रमाला जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. या पदवीत त्यांना उत्तम गुण मिळाले. याच कोर्स दरम्यान, बंगलोर येथे सी एन आर राव यांनी शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सुरू केलेल्या एनसी एएसआर या ३ वर्षांच्या संशोधनपर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली.... 

!! स्पर्धा परीक्षा प्रवास!!
आपल्याला जीवनात काय करायचे आहे याचा पूर्णपणे विचार करा. त्यानंतर ती गोष्ट करण्यास सुरुवात करा, परंतु त्यात पहिल्यांदा काही वेळेस अपयश आले तर हार मानू नका. आपल्या ध्येयावर टिकून राहून कार्यरत राहिले तर आपल्याला यश निश्चितच मिळत असते,
आपले ध्येय व जिद्दीच्या जोरावरच सातपुते यांनी 2009 साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. आपली आवड ओळखून त्यांनी मराठी आणि इतिहास हे विषय मुख्य परीक्षेसाठीं निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकलं. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली. दुसऱ्या प्रयत्नात 2012  साली देशात 198 क्रमांक मिळवून त्या आय पी एस झाल्या.यु. पी. एस. सी परिक्षेत यश संपादन केले ... 

!! विवाह बंधनात अडकले सौ.तेजस्वी व श्री.किशोर !!
बालपण प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण त्याच सोबत आयपीएस म्हणून नियुक्ती नंतर विवाह बंधनात  दिल्ली स्थित असलेल्या श्री.किशोर रक्ताटे यांच्या सोबत तेजस्वी सातपुते या बंधनात अडकल्या. किशोर रक्ताटे त्यावेळी केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते... 

!! आयपीएस प्रशिक्षणासाठी रवाना!!
सन 2012 साली ऑगस्ट महिन्यात तेजस्वी सातपुते या मसुरीत प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या तिथे 100 दिवस त्यांचा फौडेशन कोर्स पुर्ण झाल्यावर हैद्राबाद येथील प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलिस अकादमीत पुढील प्रशिक्षण झालं. हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर 2012 ते जानेवारी 2014 या कालावधीत त्यांनी पुर्ण केलं.....

!! खाकी वर्दीतील कर्तव्याला प्रारंभ!!
फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2016 या काळात परिविक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी सुट्टी घेतल्याने त्यांचा परीविक्षाधिन कालावधी जळगाव अन जालना अशा दोन जिल्ह्यात पुर्ण करावा लागला.
त्यानंतर त्यांची नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून झाली. तिथे त्या डिसेंबर 2014 ते एप्रिल 2016 दरम्यान होत्या. नंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलिस अधीक्षकगुप्तचर विभागातुन त्यांची बदली झाली पुणे ग्रामीणला. पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणुन त्या सव्वा वर्ष कार्यरत होत्या. नंतर पुणे शहर पोलिस दलात त्यांची नेमणूक उपायुक्त (वाहतूक) या पदावर झाली. 
पुण्याच्या वाहतुकीतील यशस्वी प्रयोग पुणे शहराच्या वाहतूक पोलिस उपायुक्तपदी त्यांनी केलेल्या प्रयोगांची चर्चा झाली. एखाद्या निर्णयाला नागरिकांचा विरोध असला, तरी तर्कशुद्धपणे जागृती केली आणि योग्य भूमिका मांडली; नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो, हे या काळातील त्यांच्या उपक्रमांमधून दिसून येते. दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पुण्यामध्ये हेल्मेटसक्तीचे निर्णय याआधी अनेक वेळा फसले आहेत. तेजस्वी सातपुते उपायुक्त असताना, हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या पुढाकाराने अल्पावधीमध्ये हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण अल्पावधीत २० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले. हेल्मेटच्या वाढत्या वापराचे सकारात्मक परिणामही काही काळातच दिसून आले. हेल्मेटच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे या काळातील शहरातील अपघाती मृत्यूचे प्रमाण ४० ते ४५ टक्क्यांनी कमी करण्यामध्ये यश आले

!! फेब्रुवारी 2019 मध्ये त्या सातारच्या महीला पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतला!!
 सातारची कारकीर्द ठरली अविस्मरणीय 
आक्रमक तेजस्वी बाण्याने अल्पावधी काळातच तेजस्वीने मिळवला नावलौकिक 
सातारा पोलिस दलाचा तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती होताच सातारा जिल्हा पोलिस दलाची धुरा यशस्वीपणे पेलली व पोलिस दलात सर्व सामान्य जनतेच्या मनात तेजस्वी विचारांचा आदर निर्माण केला .. गुन्हेगारी वर्गात तर अनेक टोळ्यांना मोट्ठे व तडीपारी करत तेजस्वी सातपुते यांनी दबदबा निर्माण केला.सामाजिक कार्यात व वेगवेगळ्या संकल्पना राबवत संवेदनशील मनाची अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला ... तसेच कोरोना काळात पोलिसांच्या सोबत जिल्ह्या्वर ठेवले होते कंट्रोल. सातारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा पोलिसांसाठी पुढाकार.सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी 7 दिवसाच्या आत पोलिसांसाठी चैतन्य हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल उभे केले. या वेळी तेजस्वी सातपुते यांच्या या उपक्रमाचे सगळ्यांनी कौतूक केले.व तो उपक्रम राज्यात राबविण्यात आला होता तसेच  
झी 24 तास या वृत्तवाहिनीने  सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचा कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान तत्कालीन गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत मध्ये केला होता.. 

कॅन्टीनचे आधुनिकीकरण 
पोलिसांसाठी राखीव असलेल्या कॅन्टीनचे अत्याधुनिकीकरण करून पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिकाधिक सुविधा मिळवून दिल्या. त्याचबरोबर कॅन्टीनच्या उत्पन्नामध्ये 10 पटींनी वाढ करून सरकारच्या तिजोरीत भरच टाकली..
सैनिकांसाठी एक दिवस' या उपक्रमाचे अभूतपूर्व यश पाहता, तत्कालीन मा. पोलिस महासंचालक यांनी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड काळात केलेल्या कामासाठी भारत सरकारच्या महिला आयोगाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला....

!! सन 2020 साली सोलापूर ग्रामीण येथे बदली!!
सोलापूर ग्रामीण येथे झाली. सोलापूर ग्रामीण हे खुप मोठे आव्हान होते परंतु याला सुद्धा तेजस्वी सातपुते अपवाद ठरल्या..

तेजस्वी सातपुते यांची चमकदार कामगिरी

!! ऑपरेशन परिवर्तनचा राज्यात डंका!!
वेगवेगळ्या संकल्पना राबवत आपल्या यशाची घौडदौड चालूच ठेवली.हातभट्टीच्या दारूचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन हाती घेतले. पिढ्यानपिढ्या गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या आणि एका अर्थाने समाजाने वाळीत टाकलेल्या आतापर्यंत 327 कुटुंबाचे या मोहिमेमध्ये पुनर्वसन करण्यात आले. यामध्ये या कुटुंबातील सदस्यांना नोकरी, किराणा दुकान, चहाची टपरी, रिक्षा अशा स्वरूपाच्या व्यवसायात सक्रियपणे पुनर्वसन केले आहे. पोलिस दलातील कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आतापर्यंत 3000 हून जास्त
समुपदेशनाची सत्रे घेण्यात आली आहेत. 'ऑपरेशन परिवर्तन या उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या प्रारुपाच्या साह्याने हातभट्टीच्या दारूच्या उत्पादन वापराचे प्रमाण जवळपास 80-85 टक्के कमी करण्यात या 'झिरो बजेट' उपक्रमांतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्याचबरोबर अनेक पिढ्यांपासून या व्यवसायामध्ये असणारे लोक आता नव्या आणि चांगल्या मार्गावर रुळली आहेत, ही पोलिस दलासाठी अभिमानास्पद बाब आहे. हे अभियानही आता राज्यभर राबविण्याबाबत मा. पोलिस महासंचालक यांनी निर्देश दिले आहेत..ऑपरेशन परिवर्तन' राबविताना 537 केसेस दाखल झाल्यास असून साडेसोळा हजार हातभट्टी दारु केली जप्त पोलिसांनी आठवड्यातून दोन दिवस कारवाई करताना मुळेगाव तांडा परिसरातून जवळपास 95 लाखांचा मुद्देमाल जप्त केला जनजागृतीतून तरुण व महिलांना गुन्हेगारी वाईट असल्याची करून दिली जाणीव हातभट्टी दारु बनविणे बंद केलेल्यांना नवा समाजमान्य व्यवसाय, त्या कुटुंबातील तरुणांना नोकरी देण्याचा यशस्वी प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉनतर्फे मुळेगाव तांड्यातील 41 महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण मशीन ऑपरेटर व फॅशन डिझायनिंगच्या 45 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सुरु झाला परिवर्तन उद्योग समुह मुख्यमंत्री रोजगार योजनेतून कर्ज उपलब्ध करून देऊन 18 शिलाई मशीन खरेदी केल्या हातभट्टी दारु निर्मितीची ओळख पुसून मुळेगाव तांड्यावर 'परिवर्तन' उद्योग समुहाची सुरवात तेजस्वी विचाराने झाली. या ऑपरेशन परिवर्तन मुळे 604 जणांनी तो व्यवसाय सोडला....

!! सर्व सामान्य जनतेची प्रतिक्रिया !!...
तेजस्वी सातपुते यांच्या या परिवर्तनाच्या चळवळीत पूढची पिढी सुखाने दोन घास खाऊन हक्काने आपले जीवन जगु शकते. आज सातपुते यांच्या विषयी अनेकांच्या मनात आदरयुक्त प्रेम व विशेष करून पोलिसांच्या विषयी आपुलकीची भावना व्यक्त होत आहे.

!! आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी योग्य नियोजन!!
पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.इथे पोलिसांचा कसं लागतो परंतु तेजस्वी सातपुते यांनी आपली जवाबदारी व आपल्या जिल्हा पोलिस दलाची ज्योत यशस्वीपणे पेलली आहे.

!! जॉब फेअरमध्ये सातत्य !!
ऑपरेशन परिवर्तन, पारधी समाजातील सुशिक्षित तरूण आणि पोलिसांच्या पाल्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी, त्यांच्यासमोरील अडचणी कायमस्वरूपी दूर व्हाव्यात, यासाठी सातत्याने पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरु राहतील.. 

!! चांगल्या कर्तृत्वासाठी सन्मान!!
दिल्ली: कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सोलापूरच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांचा आज दिल्ली येथे राष्ट्रीय महीला आयोगाच्यावतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.... 
प्रसिद्ध नवभारत वृत्तपत्राकडून उत्तम कामगिरीसाठी राज्यपालांच्या हस्ते सन्मान
ऑपरेशन परिवर्तन' या उपक्रमाचे अभूतपूर्व यश पाहता सरकारच्या वतीने मा. पोलिस महासंचालक यांच्याकडून राज्यातील सर्व जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.....

!! तेजस्वीचा लोकसभेत डंका !!
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ऑपरेशन परिवर्तनचा लोकसभेत डंका. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले कौतुक ..
अवैध धंद्यांच्या उच्चाटनासाठी राबवले विशेष अभियान; सोलापूर ग्रामीण पोलिसांचं ऑपरेशन परिवर्तन यशस्वी.
सोलापूर ग्रामीणचं 'ऑपरेशन परिवर्तन' देशभर राबवा असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले होते...

!! सोलापूर येथे कर्तव्याला असताना सातारला पुरस्कार !!

महाराणी येसूबाई पुरस्कार तेजस्वी सातपुतेंना
यांना प्रदान शाहुनगरीमध्ये छत्रपती घराण्याचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी आणि आधुनिक काळाशी सुसंगत आणि लोकोपयोगी विविध उपक्रम राबवण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्रित येऊन शाहुनगरी फौंडेशनची स्थापना झाली आहे. या फौंडेशनच्यावतीने कर्तृत्वान महिलांसाठी महाराणी येसूबाई पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. याचा पहिला पुरस्कार सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा सातारा येथे सन्मान करण्यात आला.

!! ऑपरेशन परिवर्तन'ला राष्ट्रीय पुरस्कार!!
तेजस्वी सातपुते यांच्या या उपक्रमाला मिळालेला हा देशपातळीवरील दुसरा इंडस्ट्रीज' संघटनेने स्मार्ट पुरस्कार ठरला आहे.एफआयसीसीआय'कडून कामाचे कौतुक  जिल्ह्यातील तांड्यांवर तयार होणारी हातभट्टी दारूची ऑगस्ट २०२२ मध्ये केवळ 31 केसेस असून या महिन्यात अवघी 30 हजार रुपयांची हातभट्टी दारू पोलिसांना कारवाईवेळी सापडली
1.76 लाखांची हातभट्टी,आली  30 हजारांवर

!! श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या यशाचे गमक!!
आपल्या कार्यकर्तृत्व व कामगिरीच्या जोरावर एक एक शिखर सर करीत यशाची घोड दौड सुरू ठेवली आहे... कार्यक्षेत्रात कर्तव्यावर असतांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांचा हातखंडा मोठा आहे कनिष्ठ कर्मचारी ते अधिकाऱ्यांपर्यंत समतोल राखत कार्य पूर्णत्वास नेणे हा त्यांच्या कामाचा विशेष गुण आहे आपल्या उत्कृष्ठ कार्यशैलींने सोलापूर ग्रामीण व सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची व पोलिस खात्याअंतर्गत सर्वांची मने जिंकणाऱ्या अशा खाकीतल्या रणरागिणीला पोलिस मित्राचा मनापासून सलाम...

संकलन: श्री. उदय आठल्ये
पोलिस लेखक सातारा 
संपर्क: 9975163547

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: solapur sp tejaswi satpute birthday article write uday athal
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे