इक्बाल शेख यांनी केले पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन...

सोलापूर ग्रामीणचे पोलिस हवालदार इक्बाल शेख यांना पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे मार्गदर्शन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलिस दलात सीसीटीएनएस विभागात कर्तव्यपालन करत असताना १० सुवर्ण, ७ रौप्य, ११कांस्य पदके, १ राष्ट्रीय पारितोषिक, चांगल्या कामगिरीबाबत २० प्रशंसा - प्रमाणपत्रे पटकावणारे पोलिस हवालदार इक्बाल शेख यांनी पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे मार्गदर्शन केले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस हवालदार इक्बाल शेख यांना पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे मार्गदर्शन करण्यासाठी पाठविण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिस दलात ज्या पोलिस अधिकाऱ्यांना सेवेची १० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन ६ मार्च ते १८ मार्च या कालावधीत करण्यात आले होते. या मध्ये सर्व प्रशिक्षणार्थी, पोलिस अधिकारी यांना शेख यांनी सीसीटीएनएस, गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेणे व गुन्हे प्रकटीकरणांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अद्यावत माहिती उपलब्ध करून घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. 

दरम्यान, याच प्रशिक्षण कालावधीमध्ये १० मार्च रोजी त्यांची मुलगी आलीया हीचा वाढदिवस सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्या समवेत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या बद्दल त्यांनी सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, मित्र या सर्वांचे आभार मानले.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

 

गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलिस हवालदार इकबाल शेख यांचा सत्कार!

पोलिस हवालदार इकबाल शेख यांचा जल्लोषात सत्कार...

पोलिस हवालदार इकबाल शेख यांना 'शिवस्वराज्य पंढरी रत्न' पुरस्कार प्रदान!

पोलिस हवालदार इकबाल शेख यांना राष्ट्रीय पारितोषिक प्रदान

पोलिस हवालदार इक्बाल शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

पोलिस हवालदार शेख यांची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: solapur rural police news police constable iqbal shaikh trai
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे