सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या...
सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशावरुन करण्यात आल्या आहेत.बार्शी (सोलापूर) : सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशावरुन करण्यात आल्या आहेत.
तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या कार्यंकाळातील व ज्या अधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यांमध्ये कालावधी पूर्णं झाला आहे अशा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदलांचे आदेश पोलिस अधीक्षकांनी जारी केले. यामध्ये बार्शी शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून अण्णासाहेब मांजरे यांची ५ महिन्यांतच बार्शीं तालुका पोलिस ठाणे येथे तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षांतून बार्शीं शहर पोलिस ठाण्यांत नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या पदस्थापने ठिकाणी बदल्या आदेशांमध्ये तत्काळ पदभार घेण्यांचे आदेश पोलिस अधीक्षकांनी जारी केले आहेत. तत्कालीन पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या बदलीनंतर रुजू झालेले पोलिस निरीक्षक अण्णासाहेब साहेब मांजरे यांची अवघ्या ५ महिन्यांतच बदली झाली आहे. बार्शी तालुका पोलिस ठाणे निर्मितीनंतर या पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पहिले वरिष्ठ अधिकारी म्हणजे अण्णासाहेब मांजरे. मांजरे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असल्यांने तालुका पोलिस ठाण्यांचा पदभार घेतील का की ? अन्य पर्यांय शोधतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
बार्शीमध्ये महिला बसमध्ये चढत असताना चोरी; 6 तासात अटक...
सांगोला शहरात मोटारीमधून देशी-विदेशी दारु साठा जप्त...
सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई; २९ मोटार सायकली जप्त...
पुणे-सोलापूर महामार्गावर मोटारीचा पाठलाग करत केले फायरींग अन्...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.