गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलिस हवालदार इकबाल शेख यांचा सत्कार!

पोलिस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी आजतागायत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन वळसे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव नावलौकिक केल्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.

पुणे: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पोलिस हवालदार इकबाल शेख यांचा गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र पोलिस दल हे सर्वोत्तम: गृहमंत्री वळसे-पाटील

सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस हवालदार इकबाल अ. रशीद शेख यांनी कमी सेवा कालावधी मध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावत विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आजतागायत १० सुवर्णपदक, ०७ रौप्यपदक, ११ कास्यपदक ०१ राष्ट्रीय पारितोषिक, पोलिस महासंचालक पदक व इतर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनेक प्रमाणपत्रे/प्रशस्तिपत्रे पटकावून देशपातळीवर सोलापूर पोलिस दलाचा झेंडा फडकविला आहे. 

पोलिस हवालदार इकबाल शेख यांचा जल्लोषात सत्कार...

शुक्रवारी (ता. 16) गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य मुख्यालय, पुणे या कार्यालयास सदिच्छा भेट व सत्कार समारंभ करिता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये पोलिस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी आजतागायत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन वळसे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव नावलौकिक केल्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. 

पोलिस हवालदार इकबाल शेख यांना 'शिवस्वराज्य पंढरी रत्न' पुरस्कार प्रदान!

सदर सत्कार समारंभ वेळी अतुलचंद्र कुलकर्णी अप्पर पोलिस महासंचालक, मकरंद रानडे विशेष पोलिस महानिरीक्षक, रंजनकुमार शर्मा विशेष पोलिस महानिरीक्षक, फत्तेसिंग पाटील विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रवीण साळुंखे विशेष पोलिस महानिरीक्षक, संभाजी कदम पोलिस अधीक्षक, प्रशांत पांडे पोलिस निरीक्षक, किरण कुलकर्णी, जावेद खान, संदीप शिंदे पोलिस हवालदार व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

पोलिस हवालदार इकबाल शेख यांना राष्ट्रीय पारितोषिक प्रदान

पोलिस हवालदार इक्बाल शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

पोलिस हवालदार शेख यांची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: solapur police iqbal shaikh honored hm dilip walse patil pun
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे